बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

सिर्फ संडे को खाना

एक छोटेखानी कुटुंब आहे, ज्यात नवरा, बायको(माझी मैत्रीण), छोटी मुलगी, सासू ई. दररोज नणंद, तिचा छोटा मुलगा आणि नवरा असतात माझ्या मैत्रिणीकडे, ऑफिस ला जाता येता त्यांच्या मुलाला ने-आण करण्यासाठी. माझी मैत्रीण, नणंद आणि तिचा नवरा हे नोकरी करणारे आणि दररोज घराबाहेर पडणारे. बाकी मुलं, सासु आणि मैत्रिणीचा नवरा घरी. माझी मैत्रीण दररोज सकाळी घरच सगळं करून येते, सकाळचा नास्ता, स्वयंपाक आणि संध्याकाळचं / दुपारचं खाणं पण. त्यात प्रत्येकाची आवड वेगळी. मुलं लहान म्हणून त्यांच्या पण आवडी-निवडी. असो.

दर रविवारी एक सुंदर वाक्य तिला ऐकायला मिळत. कारण रविवारी ती सगळे पदार्थ ज्याच्या त्या वेळी करते. त्यामुळे सगळ्यांना गरम खायला मिळत. "हा एक रविवारच आहे ज्या दिवशी काही झाल्यासारखं वाटत हो, गरम मिळत..." इति सासू. "बाकी दिवशी तर काही जात च नाही घश्याखाली". देवा. मी हे ऐकून निःशब्द झाले, पूर्णपणे. ह्याला काय म्हणायचं. आणि माझी मैत्रीण आहे म्ह्णून नाही पण खूप छान आणि विविध पदार्थ करतेच ती, सर्वांच्या आवडी-निवडी सांभाळते. संध्याकाळी मावशी सगळी चिराचिरी करून ठेवतात त्यामुळे सकाळी सोय होते हिची. पण हे काय बोलणं झालं. छे छे. बरं (उलट) उत्तर द्यायला शिकवलंच नाही, त्यामुळे अडतंय घोडं आणि भावतंय.

मला तर असे किस्से ऐकले कि एक विचार मनात निश्चित येतोच, "मोठे लोक म्हणजे काय मग नक्की?", असं बोलणारे?

असो, नोकरी असल्यामुळे हिला फक्त रविवारीच असलं काही बाही ऐकावं लागतंय, नाही तर रोजचंच झालं असतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...