सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

खराखुरा संशोधक

"अबसेन्ट माईंडेड प्रोफेसर" हा शब्द, एक चित्रपट आणि असे भरपूर व्यक्तिमत्व मी बघितले आहेत. त्यांना फक्त अभ्यास, नवनवीन शोध, आणि त्यांच तांत्रिक विश्व च रमायला पुरेसं असत. त्यांच्या दृष्टीने बाकी कशालाही महत्व नसतंच, मग ते कपडे असो, चपला, गाडी, जेवण, छे, ते आणि त्यांचं काम. 

गेले एक - दोन वर्ष जेव्हा जेव्हा मी ऑफिस ला गेले तेव्हा तेव्हा एक सातत्याची गती मी अनुभवली आणि त्याने माझे लक्ष वेधले. काहीही झालं तरी ती गती कधीच बदलली नाही. ऊन, वारा, पाऊस, पण गती तीच. जरा आश्चर्य वाटलं आणि सहज माझे चार डोळे अजून व्यवस्थित गोष्टी टिपू लागले तेव्हा असं लक्षात आलं कि ते व्यक्तिमत्व संशोधक असावं. मला आणि माझी काहीही हरकत नाहीच पण दररोज बहुतांशी एकच किंवा जास्तीत जास्त दोन चौकड्याचे बुशर्ट, हातात काहीही नाही, बॅग सुद्धा नाही. ठराविक वेळेला येणार सकाळ संध्याकाळ आणि पंच करणार, जाणार. बास. सतत डोक्यात काही तरी भन्नाट विचार. कधीही कोणीही नाही सोबत. एकंदरीत आवडलं मला. "लेस इज मोर" म्हणतात ते खरं आहे. विविध वर्ग असतातच ना लोकांचे, त्यातला हा विचारी, अगदी साधा, हुशार, मेहेनती,सरळ असा "त्या" खास वर्गात मोडणारा. असो. त्याच्या संशोधन कार्याला शुभेच्छा आणि सातत्याला सलाम. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...