एवढ्यातच आमच्याकडे एक गोरगोमटं, फारंच लोभस हतीच्च पिल्लू आलं होत. तसं नाही हो मंडळी, एक माझ्या मैत्रिणीची भन्नाट गोड छोटी गोलमटोल मुलगी आली होती. ती इतकी गोड होती, इतकी हजारजवाबी होती, इतकी लाघवी होती कि ज्याचं नाव ते. वैविध्य विषयावर फारच आत्मविश्वासाने बोलत होती. मी पण सतत बडबडणारी आणि ती देखील मग काय हवं. अहाहा. मधेच ती स्वतःला मुलगा म्हणून / संबोधून बोलायची. अगदी तिच्या मैत्रिणीपासून, शेजारी, फॅमिली, खाण्याच्या सवयी, मास्क, टीव्ही, गाडी, बाबांचं रागावणं, ई. असंख्य विषयावर अखंड बोलत होती, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तय्यार. मी पण काही ह्या जमान्यातले आणि काही माझ्या वेळचे ठरलेले प्रश्न विचारून तिला भंडावून सोडत होती, पण ती सगळ्यांपेक्षा दोन पाऊलं पुढे. जबरदस्तच. मी विचारलेल्या भरपूर प्रश्नांमधला एक होता, "आप यहा रह जाओ", नाही म्हणाली, मग "हम आ जाये आप के घर" तरी देखील नाही म्हणाली. म्हटलं का? तर म्हणते कशी "सीटे नही है". मला काही समजलं नाही. मग तिच्या आईनी सांगितल्यावर हसून हसून पुरेवाट झाली माझी आणि तिच्या तल्लख बुद्धीची कमाल वाटली. ती तिच्या आई बाबा आजी आजोबा आणि मोठ्या बहिणी सोबत आमच्या कडे आली होती त्यांच्या कार ने. असं म्हणणं होत, कि गाडीत माझ्या साठी बसायला जागा नाही हो. त्यामुळे मी यायचं नाही. बाप रे. अगदी झटपट, क्लिअर उत्तर, ना आड ना पडदा. आणि तिच्या आईने पण असं काही म्हटलं नाही "असं म्हणू नये...", कारणंच दिलेलं इतकं पटणार होत ना, कि ज्याचं नाव ते. आणि हे सगळं फक्त वय वर्ष तीन, देवा. पुढल्या रविवारी मी पुन्हा जाणारच आहे तिच्याकडे, तिच्याशी खेळायला / बोलायला / तिच्या सगळ्या हावभावांना एन्जॉय करण्याकरता.
#noplaceincar #verysmartgirl #talkative #smart #adorable
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा