बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१

गगनचुंबी इमारती

आजकाल ग्लास-टेकनॉलॉजी मुळे अतिशय सुंदर काचेचं काम केलेल्या इमारती बघायला मिळतात.  अर्थात सूर्यप्रकाश आणि उजेड मिळावा हा पण एक उद्देश असतोच म्हणजे वीज जास्त वापरली जात नाही सकाळच्या वेळी. गगनचुंबी कारण सध्या शहरात एक तर आडवं पसरायला जागा उरली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे छोटे छोटे प्लॉट्स असतात आणि त्याचा सदुपयोग करायचा म्हणजे मग उंच जाण्याशिवाय पर्याय नाहीच.

मला तर नेहेमीच आणि दररोज अश्या भल्यामोठ्या इमारती बघायला मिळतात. कधी त्या सोसायटीज असतात किंवा ऑफिस किंवा दोन्ही एकत्र. मी जेव्हा गाडी चालवत असे तेव्हा जमेल तसे वेगवेगळे रस्ते वापरत असे.  रोज एकाच रस्त्याने यायचं म्हणजे काय? मला जमतच नाही. असो. तसेच आता मी ऑटोने ये-जा करत आहे आणि त्यालापण कधी कधी ह्या-त्या रस्त्याने घ्यायला सांगते मी.

गगन, मोठी झाडे, पक्षी, भल्यामोठ्या इमारती बघणं आवडण्यामागे एक महत्वाचं कारण आहे. रस्त्यावर खाली बघण्यासारखं काहीच सापडत नाही मला. त्यापेक्षा डोंगर, त्याचे आकार, त्यावरच्या विविध हिरव्या रंगांच्या छटा, आकाशातली सतत बदलणारी रांगोळी,  पक्षी ई. जास्त प्रसन्न ता देऊन जातात मला. दिवसभर मोबाईल, लॅपटॉप वर खाली मान घातली असतेच ना, मग प्रवासात तरी त्या वस्तूला बाजूला सारून निसर्ग आणि मानवनिर्मित सौंदर्य अनुभवावं असं मला वाटत आणि आवडत देखील. कदाचित ह्या सर्व कारणांसाठीच उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत, झाड उंच वाढली आहेत, पक्षी अतिशय सुंदर कवायती करत उंच उडत असतात म्हणजे सगळीकडे पसरलेला कचरा बघून उगाच वाईट वाटत नाही. अर्थात मी राणी सारखी बसून प्रवास करते म्हणून हे सहज शक्य आहे मला. 


#highrisebuildings #lookup #sky #talltrees #naturebeauty #keepawaymobile #backseat #dailycommute

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...