मी एक नोकरी करणारी आई असल्यामुळे माझ्या मुलांना भलभलते अनुभव आलेत, घरी मावशींबरोबर एकटं राहणं, पाळणाघरात राहणं, तिष्ठत आईची वाट बघणं, आईच्या ऑफिस मधे येणं, थंड जेवण.... to name a few. माझ्या आणि त्यांच्या सुट्ट्या एकत्र येत नसत नेहेमीच. त्यात भरीसभर मावशी सुट्टीवर मग काय आमच्या तिघांची वरात ऑफिस ला. अर्थात माझ्या सगळ्याच ऑफिस मधे कधीही ना नव्हती मुलांना घेऊन यायची. त्यामुळे निभावलं. पण त्या वरातीत माझी बॅग, त्या दोघांच्या दोन ब्यागा, मोठे डब्बे, जास्त पाणी, करमणुकीसाठी अनेक गोष्टी, विचारू नका. देवा. आणि त्याऊपर ऑफिस ला पोचलं रे पोचलं कि "१. मम्मा आता काय करू? २. कधी घरी जायचं?".
आज हे सगळं पुराण का आठवलं म्हणताय? सांगते.
आज मी एक अप्रतिम फोटो बघितला LinkedIn वर. त्यात एका कर्त्या मुलांनी लिहिलं आहे फोटो सहित कि मी आई सोबत बऱ्याचदा ऑफिस ला गेलो होतो लहान असतांना. आज माझी आई आली आहे माझ्या ऑफिस मधे. त्याच्या खुर्चीत आई बसलेली दाखवली आहे त्या फोटोत. काकू मस्त साडी नेसून तय्यार होऊन आल्या आहेत मुलाच्या ऑफिस मध्ये, कित्ती कौतुकास्पद आहे ना हे. अहाहा. मी पण वा$$$$$ट बघते आहे केव्हा माझी बारी येईल माझ्या मुलांनी कष्टाने कमावलेल्या खुर्चीत ऐटीत बसायची. अजून ४ वर्ष थांबव लागेल त्या करता मला. मी पण अशीच तय्यार होऊन, भरपूर काही घरचे खाण्याचे पदार्थ घेऊन जाईन मुलांच्या ऑफिस मधे. नवीन ड्रेस पण घेईन स्पेशली त्या करता.
ह्या फोटो मुळे सगळी पळापळ धावपळ आठवली मला आज, माझ्या पिल्लांची पण फार दमछाक झाली, पण इलाज नव्हता. असो.
सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१
स्वानुभव
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा