शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१

टाक टाक - बेलीज आणि मी

बेलीज हा एक मुलींच्या बुटाचा प्रकार. मी इंजिनिअरिंग ची विद्यार्थी होते तेव्हा, शिकवायला लागले तेव्हा पासून विविध प्रकारच्या बेलीज च वापरल्या. मला तो टाक-टाक सुमधुर संगीतमय नाद ऐकत चालणं खूप म्हणजे खूप ऊर्जा देऊन जात असे त्या काळी. का? अजिबात माहित नाही. माझी चाल मला आवडायची. एक विशिष्ट पद्धतीने त्या बेलीज चा आवाज येत असे, आणि त्यात माझं चालणं अतिशय भरभर, त्यामुळे अजूनच मस्त. अर्थात कधीही तो आवाज फक्त ऐकत बसले नाही मी, बसणं शक्य पण नव्हतं. पण एक शान होती. एक स्टाईल किंवा वेगळेपण जाणवायचं. घालायला, वापरायला, दिसायला पण फार छान वस्तू ती. तुटायची भीती नाहीच चपले सारखी आणि क्लास वाटत कुठल्याही वेशभुषे सोबत. अशी ती बहुगुणी, अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारी वस्तू माझी सखी होती अनेक वर्ष. आता तिची आजी माझ्या सोबत आहे. तेच सर्व गूण पण जरा निर्मळ, कोमल आणि मऊ अशी, कॉटन / कपड्याची बेलीज. माझंच मला बढती झाल्यासारखं वाटतंय.

आताशा आजूबाजूच्या नवतरुण मुलींनी टाक-टाक चालायला सुरवात केली कि माझे "ते" दिवस आठवतात आणि अत्यंत रम्य अश्या भूतकाळाची सफर सहज घडते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...