शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१

अपघातांची श्रुंखला

ती अगदी लहान असतांना अचानक राजकारण्यांमुळे / घडामोडींमुळे ब्राह्मणांच्या घरांना आग लावण्यात आली, त्यात एक घर तिचं होत. त्यानंतर छोट्या मुलाला वाचवण्यासाठी भुकंपामुळे तिच्या पाठीवर भिंत कोसळली. तिच्या नवऱ्याची बदलीची नोकरी. त्यामुळे सतत एका ठिकाणांहून दुसरीकडे जाण-येण. त्यावेळी फक्त सरकारी जीप असायच्या प्रवासाकरता. अगणित त्या जीप चे झालेले अपघात. चूक कोणाची, कशी ई. न पडता त्यातून बाहेर येणं ह्याला तिने जास्त महत्व दिल. सगळे जीव वाचले, ड्राईव्हर सहित हे महत्वाचं. हे झाले असंख्य शारीरिक आघात.  मानसिक प्रहार पण तेवढेच होते, अगदी छोटी असल्यापासून आणि तेही स्वतःच्या अतिशिस्तीच्या आणि कडक स्वभावाच्या मोठ्या भावाकडून. त्यानंतर अनेक छोटो मोठे प्रसंग आले पण तिने सगळं निमूट पणे आणि आनंदाने मान्य केलं. कधीही भगवंतावरची तिची श्रद्धा ढळू दिली नाहीच. कोणालाही कधीही दोष दिला नाही. कोणावरही भार न होता, उलट भरपूर आठवणी, शिकवणी, वैचारिक संपत्ती देऊन ह्या जगाचा निरोप घेऊन गेली पण.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...