रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

बेसिक ऐमिनिटीज

" बेसिक ऐमिनिटीज " हा शब्द म्हणजे सोसायटी मधे काय काय देऊ केलं आहे बिल्डरनी, ह्या अनुशंघाने वापरला जातो सहसा. पण जेव्हा पासून मला स्वतःला माझ्या पायांचा त्रास सुरु झाला, अगदीच चालणं / पाऊल टाकणं अशक्य झालं तेव्हा समजलं कि माझ्या साठी आणि सर्वांसाठी चालता येणं हि एक बेसिक ऐमिनिटी आहे. मी माझ्या पायांना फारच गृहित धरलं होत तो पर्यंत.

त्या नंतर मला सहज आढळून आलं कि स्वाक्षर असणं, डोळ्यांना दिसणं, कानांना ऐकू येणं, आणि अर्थातच सर्वच अवयव व्यवस्थित चालू राहणं, त्यांचं आखून दिलेलं कार्य सातत्याने चालू राहणं ह्याला च बेसिक ऐमिनिटीज म्हणतात. एक जरी बंद पडली तरी अवघड होत. अर्थात त्यातून भरपूर शिकायला मिळत ते वेगळंच.

माझ्या सोसायटी मधे अनेक मुली मी बघते त्या वाहून घेतल्यासारख्या काम करतात, घरात आणि ऑफिस मधे देखील. नुसतंच काम, अती होत बरेचदा आणि ते त्यांना देखील कळत असणार. पण मग कृती करायला हवी. मान्य आहे कि पैश्याची गरज असते सर्वांना, पण बेसिक ऐमिनिटीज चालू राहणं पण तेवढंच महत्वाचं माझ्या दृष्टीने. शारीरिक बेसिक ऐमिनिटीज व्यवस्थित काम करत राहिल्या कि मग आपण बाकीच्या ऐमिनिटीज चा उपभोग सहज घेऊ शकतो, किंबहुना रोजचा व्यवहार पण नीटनेटका करू शकतो. 

माझे एक सहपाठी होते आधीच्या ऑफिस मधे ते विद्यार्थ्यांना नेहेमी म्हणायचे जेव्हा विद्यार्थी कुरकुर करायचे ते, कि तुम्हाला सगळं सहज मिळालं आहे त्याचे धन्यवाद माना सतत नाहीतर आपण एक चक्कर मारून येऊ सरकारी रुग्णालयाची म्हणजे तुम्हाला जास्त चांगल समजेल कदाचित, जे आहे त्याचं महत्व. असो. 

माझी हि नवीन परिभाषा "बेसिक ऐमिनिटीज" ची, तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते आणि सर्वजण त्याची काळजी घेतील हि अपेक्षा.

२ टिप्पण्या:

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...