मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१

मोठी तिची सावली... मोलकरीण बाई

ह्या नावाची एक नवी मलिका सुरु होत आहे उद्या पासून. त्यावर एक छोटासा लेख आला आहे वर्तमानपत्रात आज. ह्या मालिकेच्या जाहिराती बघितल्या बऱ्याच. आणि असा जाणवलं कि हि मालिका खूप विचारांती घडवली आहे. अगदी रोजचा विषय हाताळला आहे ह्यात. थोडक्यात म्हणजे आज च्या ज्या नोकरी किंवा रोजगारी साठी बाहेर पडणाऱ्या मुली / बायका आहेत त्यांच्या साठी घरी काम करणाऱ्या मोलकरणी ह्या फार महत्वाची भूमिका निभावतात, अगदी सावली सारखी. मोठ्या सावली सारखी म्हटल्या सारखं. दोघींचाही फायदा होतो मालकिणीच्या आणि मोलकरणीचा देखील. घरकाम हे हि प्रचंड असतं, संपणार असंच. त्यात जर भन्नाट मस्त बाई जर मिळाली तर रोजच जगणं सुखकर होत अजून. दोघीही त्यांच्या त्यांच्या मानानी कचेरीतच जातात, कामं वेगवेगळी असतात, स्वरूप भिन्न असत पण एकमेकींची साथ मिळाली तर सोन्याहून पिवळे, नाही का? बघायची आहे हि मालिका मला. सगळे कलाकार हि खूप निवडून घेतले आहे, कसलेले आहेत, त्यामुळे काही छान उपयुक्त पहिल्याच समाधान मिळेल असं वाटतंय.

Shared on FB on Mar 24th 2019.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...