शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१

मायक्रोसॉफ्ट टिम


मी हे अनेकदा अनुभवलं आहे कि मला मायक्रोसॉफ्ट टिम मधे अचानक ऍड करतात. असं कित्येकदा होत नाही आयुष्यात देखील, कधी, कुठे, केव्हा, कोण, काय ऍड करेल ते सांगता येत नाहीच. पण आपण हसत-खेळत, धडपडत, चाचपडत आणि अंशतः कधीतरी रडत त्याला सामोरे जातोच. अगदी जसे टिम. एकदा त्या टिम चा तुम्ही भाग झालात कि जिंकायचंच, नाही का?, धडपडत, हसत-खेळत सर्वांसोबत. आवडत नसलं तरी देखील सुरु करायचं, आवडायला लागत हळू हळू. आणि त्याचा महत्वाचं अर्थ असा असतो कि तुम्ही आवश्यक आहात त्या टिम साठी. त्यामुळे जे जे होतंय ते तुमच्यासाठी गरजेचंच आहे, अत्यावश्यक आहे. आणि फार काही शिकवून जाणार देखील. नाही का? आधी मला वाटायचं "अरे बाप रे आता नवीन टिम का?" पण आता "अरे वा वा छान च अजून एक टिम". खूप जास्त टिम दिसल्या डोळ्यासमोर,
सध्या लागणार नसेल तर त्यातल्या ज्या सध्या नको असल्या त्या हाईड करायच्या, सोप्प आहे. म्हणजेच, अगदी खऱ्या आयुष्यासारखे, जर एखादी गोष्ट आपल्याला पटत नसेल तर "दृष्टी आड सृष्टी", थोड्या वेळा करता / क्षणभर डोळे बंद करायचे, आणि पुन्हा नव्या जोमाने सुरु. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...