सोमवार, १ फेब्रुवारी, २०२१

मुक्त...

 

 "अनलीशड व्हर्जन" अक्का वाद्यमुक्त असं भजन गायला, ऐकायला आणि सादर करायला एक वेगळीच मज्जा येते, दूरदर्शन च्या अनेक वाहिन्यांवर असे खास कार्यक्रम आयोजित करतात आणि ते खरं गायन, माझ्या मते. सूर आणि ताल वाद्य साथीला असले तर "सोने पे सुहागाच" आणि अश्या वाद्यांमुळे भजनाला उभार तर येतोच पण साथसंगत असल्यामुळे त्रुटी असतीलच तर झाकल्या जातात. वाद्यमुक्त गायनातच खरा कस लागतो.
 हो, आम्ही सगळ्या श्री. दत्त भक्तांनी अश्याच सुरेल गायनाचा अनुभव घेतला, अर्थात हा पहिलाच प्रयन्त होता. पुढल्या वेळी रंगत वाढेल ह्यात शंकाच नाही. कारण शेवट हि सगळी प्रभू चरणी समर्पित सेवा आहे, आपण कोण हो गाणारे ऐकणारे.... "पूर्णब्रम्हापणमस्तु, इदंन न मम् " हेच खरं सत्य आहे फक्त माझ्या दृष्टीने. ह्या वर्षी श्री. दत्त जयंती भजन कार्यक्रम ऑनलाईन करावा असा विचार आहे आणि हि सगळी त्या दृष्टीने उचलली पाऊले, बघुयात श्री. च्या मनात नक्की काय आहे ते. आम्ही सगळे फक्त प्रयन्त करतो आहे आणि ते चालू राहावे हि प्रार्थना.     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...