बुधवार, १० फेब्रुवारी, २०२१

आनंद

  "आनंदी आनंद गाडे जिकडे तिकडे चोहीकडे“

 "किती सांगू मी सांगू तुम्हाला$$$ आज आनंदी आनंद झा$$$ला ... “
 "आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग...“
 
 असं काहीस झालंय आज, कोणाला म्हणताय? बरोबर ओळखलंत मंडळी, अगदी बरोबर, काडी-कुलपाला,  बाकांना, प्रोजेक्टर आणि फळ्याला, आणि अक्ख्या वर्गाला अगणित आनंद झाला आहे आज. आज तब्बल एक वर्षांनी चावीने संवाद साधला कुलपाशी. "आज मै उपर आसाम नीचे..." असं म्हणत. अहाहा, सगळ्या कॉलेज ला एक वेगळं रुपडं, साजिरं-गोजिरं... लाभलंय असच वाटतंय आज. सरते शेवटी माझ्या / आमच्या तमाम विद्यार्थ्यांचं आगमन लवकरच होणार असं दिसतंय एकंदरीत. 
का ऑफिस ला पोचले तर काय सगळेच्या सगळे वर्ग मोकळा श्वास घेत होते, लख्ख प्रकाश आणि माणसं आजूबाजूला अनुभवत होते. फारच वेगळं वाटतंय. आगमनाची जय्यत तय्यारी सुरु आहे मुलांच्या.  कोपरांकोपरा लखलखीत दिसतोय, पंखे-दिवे लागले गेलेत, आता आमची टीम जाऊन प्रत्येक प्रोजेक्टर संगणक सुरु करून बघेल, आणि मग किलबिलाट सुरु होईल, संपूर्ण इमारतीला जीवन मिळेल, पुन्हा एकदा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...