बुधवार, १० फेब्रुवारी, २०२१

लाल सिग्नल / कासवाची गती...

  माझं "न्यू-नॉर्मल" तीन वर्षा पूर्वीच सुरु झालं. 

कसं काय म्हणताय? 
सांगते. 
अचानक एका छोट्याश्या तापामुळे जेव्हा माझे दोन्ही
 पाय बंद पडले तेव्हा माझ्या पायाखालची जमीन हादरली, डोळ्यासमोर अंधारी आली, एक मोठा कधीही न बदलणारा लाल 
सिग्नल जसा अशी अवस्था झाली खरी पण वैविध्य प्रयत्नानंतर आता पुन्नरुजीवन मिळाल्यासारखं झालं, एक आशेचा किरण 
दृष्टीपथात आहे. 
बघू यात, 
एक दिवस एका दिवशी हातात आणि डोक्यात ठेवायचा / घ्यायचा आणि पुढची वाटचाल करायची असं ठरवलं आहे 
सध्या. 
पण ह्या सगळ्यात मी फक्त रोबोट सारखी ऑफिस ला जाते आणि घरी येते. बास. त्यापुढे काहीही जमतच नाही. त्याच फार 
वाईट वाटतंय मला. मी अनेक जणांना फोन करायचं, घरी बोलवायचं, त्यांच्या घरी जायचं ई. टाळतेय, कारण मला माझ्या 
पायांची खात्रीच राहिली नाही. अनेकांचे गैरसमज होतील असं मनात आलं, पण  नाही, सगळेच समजावून घेत आहेत. लवकरच 
सर्व पूर्ववत होईल (गती वाढणं, जाण येणं, गाडी चालावणे आणि बरेच काही) हि अपेक्षा आणि प्रार्थना देखील. जुन्या काळी 
आणि जुन्या गोष्टीत कासव जिंकला होता, तसेच काहीसे आहे डोळ्यापुढे. बघू यात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...