मी एका सरांबरोबर ऍडमिशन च्या ग्रुप मधे काम करते. आणि
अनेकदा त्यांच्या बरोबर मी गाडीत लिफ्ट पण घेतली आहे, बऱ्याच
वर्षा पासून एकत्र
काम केल्यामुळे आम्ही खूप छान ओळखतो एक मेकांना आणि तेही चिल्ड आहेत. ऍडमिशन च्या
वेळेस जर
काही वेगळेच प्रश्न उद्भवले तर ते अगदी कूल उत्तर सांगतात, वगैरे.
तर तेच
सर काल अचानक हातात दोन मिठाईचे बॉक्स घेऊन आले. म्हटलं कशाची मिठाई? तर म्हणाले
विद्यावाचस्पती झालो मी.
अभिनंदचं केलं त्यांचं आणि त्यांची अपेक्षा होती कि मी
फक्त एक पेढा घ्यावा म्हणून त्यांनी बॉक्स उघडला आणि माझ्या समोर उभे
राहिले. मी
पूर्ण बॉक्सचं घेतला. त्यांना सुखद धक्का बसला. म्हटलं एका पेढ्याने माझं काय
होणार. अख्खा बॉक्स पाहिजे सध्या,
त्यानंतर पार्टी हवीच. बिचारे, कधी वाटलं नसेल
त्यांना माझ्या सारख्या शी पाला पडेल ते. पण खूप खदखदून हसलो सगळे त्यामुळे
आणि एक
वेगळी गम्मत आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा