माझ्या लहानपणी अनेक कार्यक्रमाला किंवा सणांना आई
बाबांसोबत माझी स्वारी कुमारीका म्हणून अत्यंत उत्साहात
सगळीकडे जात असे आणि
यथेच्छ पोटभर आनंदाने सगळं फस्त करत असे. त्यामुळे मी "कुमारीका" म्हणून
प्रसिद्ध होते.
अश्या सगळ्या ठिकाणी बहुतेक आम्ही लवकर जात असू थोडीशी मदत
करण्यासाठी. त्यामुळे कधी कधी स्वयंपाक झाला
नसायचा. आमच्या घरी सुद्धा कधी कधी
स्वयंपाक करतांना फोडणीचा ठास लागत असे. दोन्ही प्रसंगात माझे बाबा मला
म्हणायचे
कसे
("बाबा उवाच")
"अगं फोडणीमुळे जर असं वाटलंच कि आपल्याला ठसका
लागतो आहे / लागणार आहे तर थोड्यावेळ बाहेर जाऊन उभं
राहावं. मोकळ्या हवेत मस्त
वाटत आणि ठसका लागत नाही. आणि हे कित्ती सोप्प आहे ना उगाच त्या फोडणी टाकणाऱ्याचा
राग करण्यापेक्षा किंवा उगाच बडबड करण्यापेक्षा, बरोबर कि नाही".
गेली काही
वर्ष मी एक गोष्ट अनुभवली, बघितली आणि त्यात उच्च विद्याविभूषित आणि अख्ख जग
फिरून आलेली लोक
जेव्हा ठाक ठाक करत, राग राग करत तेथेच बसतात जेथे फोडणीचा वास
आहे. मग त्यांच्या शिक्षणाचा आणि अनुभवाचा काय
उपयोग, "पालथ्या घड्यावर
पाणी" च नाही का? असे का असतात लोक कोणास ठाऊक. चिवित्र.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा