मी साधारणतः दहावी नंतर पंजाबी ड्रेस घालायला सुरवात
केली कारण त्यानंतर मी डिप्लोमा ला प्रवेश घेतला. आणि त्याकाळी
पंजाबी ड्रेस हेच
एक काय ते उपलब्ध होत रोजच्या वापरासाठी. त्यावेळी फक्त कुर्ते विकत सहसा नाही
मिळायचे. ड्रेस
मटेरियल घेऊन शिवायचं, बास. मग त्या ड्रेस मटेरियल बरोबर भलीमोठी
दोन मीटर ची चुन्नी येत असे. आळस म्हणा किंवा
अजून काही पण त्यावेळी चुन्नी इतकी
धुतली किंवा इस्त्री केली जायची नाही जितक्या वेळा कुर्ता आणि सलवार करावी लागतच
असे. गरज पडत नसे. त्यामुळे चुन्नी नवीन दिसायची बराच काळ. आणि मी बहुतांशी
कॉटन वापरत असल्यामुळे एका ड्रेसच
आयुष्य ६ महिने जास्तीत जास्त. त्यामुळे माझी
मज्जा असायची कारण नवीन घ्यायला मिळायचे आणि अनोखे ड्रेस तय्यार पण
व्हायचे.
कसे
म्हणताय?
सांगते थांबा.
\तर चुन्नी नवी दिसयचीच आणि ती भलीमोठी कॉटन ची. त्यामुळे मग
सगळेच नवीन ड्रेस शिवण्याशिवाय ह्या अश्या मस्त चुन्नीचा
झक्कास कुर्ता शिवून
घ्यायचा आणि त्यावर म्यॅचिंग सलवार. अहाहा, काय दिसायचं म्हणून सांगते आणि
सगळ्यांपेक्षा अनोखं
असं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
१. त्याकाळचे दर्जी / टेलर
पण का-कू नाही करायचे असं शिवायला,
२. आणि आमच्या नागपुरात एक प्रसिद्ध गल्ली होती
तेथे फक्त चुन्न्या मिळायच्या. कधी कधी आम्ही कट-पीस मधून पण छान कापड घेऊन ड्रेस
शिवत असू आणि चुन्नी वेगळी घ्यायची,
३. सढळ हाताने मोठ्या आकाराच्या चुन्न्या
तय्यार करायचे त्याकाळी. जबरदस्तच दिवस होते ते. केवढा वेळ होता आणि कित्ती आनंद
यायचा हे सगळं करण्यात.
आई शपथ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा