शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१

“उचलली जीभ आणि लावली टाळूला..."

  आज मला एक नवीन म्हण सुचली आहे "उचलला हात आणि लावला हॉर्नला..."

 चारचाकी चालवतांना हॉर्न आहे ह्याचा अर्थ तो सतत वापरलाच पाहिजे असं नाही हो. समोर दिसतंय तुमच्या डोळ्यांना, देवाच्या कृपेने मिळालेल्या डोळ्यांना कि गाडीत लहान बाळ आहे / "Baby on Board" sign, अपंग व्यक्ती स्वतंत्र आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी गाडी चालवत आहे, आजोबा / आजी आहेत समोर गाडी वर, एखादा साध्या मोडक्या सायकलवर कामाला निघाला आहे, कोणी रास्ता ओलांडत आहे  ई. मग काय हरकत आहे थोडं थांबलं आणि मग बाजूने हळूच गेलं तर? हॉर्न वाजवणं हाच एक पर्याय नाही, अजिबातच. आणि हो हॉर्न वाजवतांना समोरच्याला आणि आजूबाजूच्यांना त्रास होतो ते सोडाच, स्वतःची तर काळजी आहे ना?, का ती हि नाहीच? हॉर्न वाजवण्यामुळे गाडीवानाचे / गाडी चालकाचे / ड्राइवरचे च नुकसान जास्त होते, ऐकणाऱ्यांपेक्षा, 
कसे? 
सांगते. ऐका. 
आणि हो हे मी नाही म्हणत आहे हे, फार मोठ्या आणि अनुभवी तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अनेक व्याधी उत्पन्न होऊ शकतात सतत हॉर्न वाजवल्यामुळे, जसे कि बेहेरेपण, राग, नसांचे आजार, उच्च रक्तदाब आणि असंख्य असे. ह्या खालील एका वेबसाइट वर तुम्ही वाचू शकता अजून माहिती ह्या बद्दल जी का-नाक-घसा आणि हृदय रोग तज्ज्ञांनी दिली आहे. अर्थात अश्या आशयाच्या अजून बऱ्याच वेबसाइट्स आहेत. 
त्यामुळे लोकहो माझी कळकळीची विनंती आहे कि स्वतःला जपा, अगदी गरज असल्यास हॉर्न चा वापर करा, कारण माझ्या लेखी जो समजुदार आहे, शिकलेला आहे आणि ज्याला स्वतःची काळजी आहे तो हॉर्न न वाजवता मार्ग काढू शकतो सहज आणि नेहेमीच. 
Video and video link of this Anukatha: https://youtu.be/My5woVu6Stw

 
 https://www.thehindu.com/news/cities/mumbai/doctors-take-up-anti-honking-cause/article23675071.ece
 Most interesting websites ever: https://www.onmanorama.com/lifestyle/health/2017/04/21/everyday-health-excessive-honking-bad-heart.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...