शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१

सयाजीराजे...

 सयाजीराजे...
१८७५ साली बरोडा चे महाराज होते हे सयाजीराजे आणि त्यांच्या काळी फारच वैविध्य कार्य, उपक्रम आणि सामाजिक गोष्टी केल्या आहेत त्यांनी. आज अचानक त्यांची आठवण का आली? त्याचं कारण आहे. सांगते, ऐका. मी गेली अनेक वर्ष बसने जाण-येणं करते आहे ऑफिस ला. आणि त्यात सगळ्यात जास्त प्रवास मी जो केला आहे तो एका भल्या मोठ्या बस मधूनच. अगदी बाबा आदमच्या जमान्यातली बस होती ती, लई भारी, महाराजा खुर्च्या / सोफे जसे अशी आसन व्यवस्था होती, लेग-स्पेस भन्नाट / भलीमोठी, सामान ठेवायचंच असेल तर जागा, चालकाची केबिन एवढी मोठी कि गरज पडल्यास त्यात चालका व्यतिरिक्त ७-८ माणसं आरामात मावयाची. जुनी झाली होती पण आरामदायी होती आणि रस्त्यावर पकड छान असायची. भलीमोठी असल्यामुळे वळवायला, पार्क करायला, चालवायला कठीण होत असेल पण आमचे ड्राईव्हर काका त्याहून भन्नाट होते त्यामुळे त्यांचा तर "दाये हाथ का खेल..." होता तिला सांभाळणं म्हणजे.  ती जशी होती तसेच तिचे नाव हि होते, भल्या मोठ्या अक्षरात लिहिलेले "सयाजीराजे...". अहाहा. आता सगळ्या फारच छोट्या बसेस आहेत, आणि मला प्रकर्षाने जबरदस्त फरक जाणवतो रोजच जाता-येता. रोजच आणि फारच आठवण झाली मला / होते मला तिची म्हणून हा छोटेखानी पंक्तिप्रपंच. अर्थात हे नाव आमच्या बस ला का दिल होत हे माहित नाही, पण कदाचित आता समजतंय "ती राजा होती आणि आता आहेत त्या प्रजा" (माझ्या मते).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...