माझे नखरे...
माझ्या लहानपणी बहुतांशी तुरडाळच वापरली जायची आमटी
करण्यासाठी. बाकी डाळी अधे-मधे कधी तरी, गरज किंवा काही कारण असल्यास च.
आणि नेमकी त्यावेळची तूरडाळ बहुतांशी सालासकट येत असे. धुतांना काही सालं
निघायची, पण बरीच उरत असत आमटीत. झालं, मग माझं सुरु व्हायचं, मला नाही
आवडत हा "कचरा" आमटीत, का घातलाय ई. देवा. माझी नवीन पिढी जेव्हा लव्ह आणि
हेट अशी टोकांची भाषा बोलतात, शब्द वापरतात तेव्हा मी रागवायचे त्यांना पण
आता माझं मलाच उमगलं "कचरा" म्हणणं हे हि टोकाचच होत नाही का? अर्थात त्या
वेळी मी लहान होते, काही समजत नव्हतं खास आणि त्यात शेंडे फळ मग काय
विचारता, मोठा लाडोबा पण. आता मी स्वतः गेले अनेक वर्ष सगळं करायला
लागल्यापासून आणि आज सकाळी कुकर लावतांना डाळ धुतांना प्रकर्षाने जाणवलं
आणि आठवलं मला हे सगळं. अर्थात आताच्या डाळी स्वच्छ असतात पण थोडेसे
कधीतरी येतात सालं. खुद्कन हसू आलं, आणि माझे अनेक नखरे एका मोगोमाग एक
आठवत गेले. कोथिंबीर, नारळ / खोबरं, मोहोरी, दाणे ई. सगळंच होत माझ्या
"कचरा" ह्या परिभाषेत / व्याख्येत. फारच छळलय मी आई बाबांना त्या वेळी.
छे छे फार वाईट. माझा वेद हि अस्साच करतो सध्या पण मला खात्री आहे कि मी जस
सगळं खायला लागले, तसेच तो हि करेल नक्की भविष्यात.
शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१
माझे नखरे...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा