या बाळांनो, या रे या !
लवकर भरभर सारे या !
मजा करा रे मजा करा !
आज दिवस तुमचा समजा
स्वस्थ बसे तोचि फसे;
नवभूमी दाविन मी,
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया !
आज सकाळ पासूनच हि श्री. भा. रा. तांबेंची कविता जी आदरणीय फैय्याज ह्यांच्या स्वरात रेकॉर्ड केली आहे ती आठवली, सतत काम करतांना गुणगुणली गेली देखील. का? अजिबात माहित नाही?
१. ह्या वरून मला काही सुचलं, म्हटलं लिहावं.
२. आदरणीय फैय्याज ह्यांच्या बरोबर मला चक्क ४ तास गप्पा मारायला मिळाले होते २०१० साली. माझ्या सारखी लकी मीच. आम्ही दोघीनी अगदी शेजारी बसत लकीली मुंबई ते पुणे एकत्र प्रवास केला होता. अहाहा काय काय अनुभव ऐकायला मिळाले म्हणून सांगते. उतरायची वेळ कधी आली ते देखील समजले नाही. एकत्र चहा पण घेतला आम्ही. शेवटी उतरायच्या वेळेला त्यांचा आशीर्वाद घेतला, सही घेतली आणि कृतार्थ झाले.
ह्या कवितेवर आधारित मला सुचलेले शब्द असे:
या पायां नो, या रे या !
लवकर भरभर दोघे या !
मजा करा रे मजा करा !
आज दिवस तुमचा समजा
स्वस्थ बसे तोचि फसे;
नवभूमी दाविन मी, (नवभूमी = रोज चे ऑफिस मधले, ऑफिस ला जाणे हे हि चॅलेंजे च)
या घराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया ! (दुसरी = ऑफिस ची / विद्यार्थ्यांची / शिक्षणाची दुनिया)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा