मंगळवार, ९ मार्च, २०२१

सावली अक्का छबी ...

संक्रांत सण झाला, रथसप्तमी पार पडली, मार्च महिना २०२१ चा आला देखील आणि उन्हाळ्याची चाहूल लागली. सूर्य बाप्पा तळपायाला लागले आहेत आत्ताच. परवा काही कारणास्तव लवकर ऑफिस मधून निघाले आणि रस्त्यावर आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा नकळत आधी सावली शोधली माझ्या डोळ्यांनी (४ बरं का) आणि हुश्श झालं सावलीत गेल्यावर. ह्या अगदी छोट्या प्रसंगामुळे हा पंक्ती प्रपंच. अनेक वर्षांपासून अनुभवलं, वाचलं आणि जगलं देखील ह्या सावलीच महत्व. माझे बाबा नेहेमी म्हणायचे "झाडासारखं असावं, कुठलीही अपेक्षा न ठेवता फळं / फुलं आणि सावली द्यायची". लहान थोर गरीब श्रीमंत पक्षी प्राणी माणसं ई. सगळ्यांचा हवी हवीशी अशी हि बहुमूल्य अनमोल सावली. हि सावली "ती" आहे बरं का मंडळी म्हणजे माया प्रेम भरभरून देणारंच, हवं त्या पेक्षाही कित्येक पटीने अधिक आणि नेहेमीच. झाडं स्वतः उन्हात स्थिर उभे राहतात दुसऱ्यांना सावली देण्याकरता.  माहुत देखील मला असं वाटतं कि अवाढव्य हत्तीच्या सावलीत अनेक वेळा विसावत असेल, तीच गत उंट हाकणाऱ्यांची देखील असेल कदाचित. जसा जसा हा सूर्य बाप्पा आपली उन्हाची दिशा आणि प्रखरता बदलतो त्याप्रमाणे सावली देखील बदलतेंच. अनेक प्रकारची झाडं तर अशी आहेत कि ज्यांना "सावलीची झाडं" असेच संबोधतात. तर अशी हि ऊर्जा, उत्साह आणि शांतात देणारी सावली माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे माणसांना, त्यांच्या महागड्या गाड्यांना...  फक्त झाडचं सावली देतात का हो? नाही, मोठ्या इमारती पण देतात, छत्र्या पण देतात, मंडप पण देतात ई. हि झाली उन्हात हवी हवीशी सावली.  पण ह्याच शब्दाचे दोन अजून अर्थ आहेत, मायेची सावली (आई वडील, आजी आजोबा, गुरुवर्य आणि घरचे मोठे) आणि छबी (आपली पुढली पिढी). चला तर मग आज पासून ह्या सगळ्या सावली देणाऱ्या स्त्रोत ना आपलंस करूयात, काळजी घेऊयात, माया देऊयात.... नेहेमीच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...