मंगळवार, ९ मार्च, २०२१

आधुनिक सण


अनेक पिढ्यांपासून अर्थात भारतात आणि त्याहून महाराष्ट्रात मी प्रकर्षाने बघत आले आहे कि अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात, त्यात प्रचंड विविधता तर असतेच पण त्या सगळ्यांमधला एक कॉमन / समान धागा हा आहे कि सगळेच सण हे मुलींचे / बायकांचे जास्त असतात, त्यात त्यांना विविध प्रकारच्या पूजा करण्याची संधी मिळते, त्यामुळे नवीन साडी-चोळी-दागिना ई. मिळतो. मैत्रिणींना बोलवण्याची, त्यांच्या सोबत वेळ आनंदाने साजरा करण्याची संधी मिळते, गोड-धोड पक्वान्न चाखता येतात, विविध गाणी-नृत्य ई. चा पण समावेश असल्यामुळे वेगळीच मज्जा तर येतेच पण ऊर्जा हि मिळते. दोन-तीन पिढ्या एकत्र सगळं साजऱ्या करतात. आणि हे सगळं उत्कृष्ट सजावटी मधे, वैविध्य फुलांच्या सुगंधी मंगलमय वातावरणामधे. माझ्या मते हे सगळं ह्या दृष्टीने होत असे कि १) त्या काळी बहुतांशी सगळ्याच महिला घरी असत, त्यांना त्यामुळे हे सगळं व्रत वैकलै करण सहज जमत होत २) आणि त्यामुळे त्यांना महत्व दिल जायचं ३) त्याचा परिणाम म्हणून कि काय पण त्यामुळे जबाबदारीने सगळी काम मनापासून होत असत आणि बरीच अजून कारण देता येतील. आता काळ बदलला आहे त्यामुळे माझ्या दृष्टीने काही जणी असे पौराणिक सण साजरे करतात आणि बाकी सगळ्याच आधुनिक सण हि प्रचंड प्रमाणात एन्जॉय करतातच. आज हि एक असाच आधुनिक सण आहे आणि माझ्या मुलांनी शनिवारीच साजरा करायला सुरवात केली, स्वतः भन्नाट पदार्थ केला, गेम खेळला आणि पोटभर वैविध्य विषयावर गप्पा मारल्या माझ्याशी. अहाहा.  दोन्ही प्रकारचे सण महत्वाचे आहेतच आणि साजरे करण्याची पद्धत फार वेगळी आणि अप्रतिम आहे. महत्व तेच, गिफ्ट्स पण मिळतातच (अक्चुअल आणि व्हर्चुअल पण, अगदी अभिनंदनाचा पाऊस पडतो), भरपूर विविध पदार्थांची चंगळ पण असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...