मंगळवार, ९ मार्च, २०२१

"मी कात टाकली"


हा  ना एक फारच मजेशीर किस्सा आहे आमच्या ड्राईव्हर काकांचा. ते कधी अगदी शांत पणे बस चालवतात, कासवाची गती, अगदी सायकल वॉल सुद्धा पुढे जाईल अशी गती,अजिबात काहीही झालं तरीदेखील अजिबात गती  वाढवणार नाहीतच. किंवा कधी कधी काहीही झालं तरी गती कमी करतच नाहीत. असो, होत असं बस चालवतांना. आज प्रकरण काही वेगळंच होत. थोडासा विचार केला, आणि बघितलं तर असं आढळलं कि काल पर्यंत आमचे काका भलंमोठं जाडजूड लोकरीचे स्वेटर आणि माकडटोपी घालून बस चालवत असत. पण आज एकदम मोकळं-ढोकळ प्रकरण होत, ना स्वेटर ना टोपी, अगदी "मी कात टाकली" अस्सच काहीस. आणि त्यामुळे ते बस चालवण्यात झळकत होत, जश्या कि हवेशी गप्पा होत होत्या, सगळ्या गाड्यांना ओव्हरटेक केलं गेलं, मस्त मोठ्याने हॉर्न वाजवत आणि गती पण जास्त होतीच. बस मधल्या सहप्रवाशांना देखील लक्षात आलंच पण कारण लक्षात आल्यावर मोठ्याने हशा पिकला. आता हेच मला नॉन मराठी मंडळींना समजावून सांगायचं आहे हिंदीत आज संध्याकाळी. देवा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२४६४: तळ गाठणे

आमच्या सोसायटीत चार बोरवेल आहेत. त्यापैकी दोन चालत नाहीत, एक चालू आहे, आणि चौथ्याबद्दल मला फारशी माहिती नाही. त्या बोरवेल खोदताना मोठमोठ्या ...