रविवार, १६ मे, २०२१

दर्जेदार आणि जनता वर्ग ... (classes vs masses)

वडील ह्या सौज्ञेबद्दल मला फारच आदर आहे, कारण वडील हि व्यक्ती एक कुटुंबाचा भक्कम आधार आणि छत्र असते, आणि नेहेमीच राहते. वडिलाची जागा कोणीही कधीही घेऊ शकतच नाही. त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी असते, आर्थिक, सामाजिक, आणि व्यावसायिक. आधीच्या काळात तर फक्त वडीलच अर्थार्जन करायचे. पण आता थोडस जग बदललं आहे. वडिलांइतकी नाही पण आईचीही बऱ्याच कुटुंबात कमाई असतेच, शिक्षण असत, आणि बहुतेक आई वडील दोघेही एकसारखाच वेळ घराबाहेर कचेरीत घालवतात. पण बरेचदा आईची कमाई हि वडिलांपेक्षा थोडी कमीच असते, कदाचित तिच्या नोकरीत बाळंतपण आणि बाकी इतर कारणांमुळे थोडा खंड पडला असेल म्हणून. दोघांनाही नोकरी करावी लागते आजकाल त्याची कारणे अनेक आहेत आणि कुटुंबागणिक ती बदलतात देखील. पण त्याचा अर्थ फक्त वडीलच महत्वाचे असं नसावं. आधीच्या पिढीत वडील बहुतेक वेळेला स्वयंपाक घरात प्रवेश करत नसत, सगळं हातात मागवत असत किंवा मिळत असे. पण है २०२० मधे जुन्या पिढी सारखं वागणं शक्य नाही / वागू नये, किंवा आता बदल होतोयं असं म्हणायला हरकत नाही. आपल्या देशात अजूनही सर्वत्र कचेरीतून आल्या आल्या आई कोचावर आणि बाबा स्वयंपाक घरात हे दुर्मिळ दृश्य आहे.

आईची कमाई कदाचित थोडी कमी, योगदान छोटसं, पण घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या, छोटी छोटी अनेक काम, असंख्य विचार, रोज काय - वेळा खायला काय करायचं ते ठरवणं, कामवाल्या बाईच्या तऱ्हा सांभाळणं, आणि.... हि संपणारी अशीच यादी आहे. त्यामुळेच आई बाबा ची तुलना होणे अशक्यच. दोघेही असामान्य असे आहेत, समाजाच्या प्रत्येक वर्गातच. बाबा म्हणजे क्लास आणि आई किंवा इतर कुटुंबातील सदस्य म्हणजे नो-क्लास असं कधी घडू नये एवढंच. हा एक भाग झाला.

दुसऱ्या भागात आहे शाळेचा विषय. पुण्यात मध्यम वर्गीयांसाठी दोन प्रकारच्या शाळा आढळतात. एक म्हणजे ज्यात असंख्य तुकड्या आहेत एकाच वर्गाच्या आणि त्या प्रत्येक तुकडीत फारच जास्त विद्यार्थी आहेत. अश्या शाळांची फी अगदी थोडकी असते. जनता शाळा अशी संबोधता येईल ह्या प्रकाराला. दुसऱ्या प्रकारच्या शाळेत मोजून तुकड्या असतात एका वर्गाच्या, विदयार्थी संख्याही मोजकीच असते, बाकी अनेकविध सोयी सुविधा असतात शाळेत, आणि भरमसाठ फी असते. दोन्ही प्रकारच्या शाळा चालतात कारण त्यांची गरज आहे आणि लोक पाठवतात पण त्यांच्या पाल्यांना दोन्ही प्रकारच्या शाळेत. दोन्ही शाळेचे विद्यार्थीं त्यांच्या आकलनाप्रमाणे व्यवस्थित प्रगती करतात. दोन्ही प्रकारच्या शाळेतील शिक्षक वृंद आप आपापली उन्नती करत राहतात प्रत्येक येणाऱ्या तुकडी बरोबर. माझ्या दृष्टीकोनातून दोन्ही शाळा सारख्याच महत्वाच्या आहेत समाजात.

वर नमूद केलेल्या दोन्ही गोष्टीमध्ये सामान्य आणि विशिष्ट्य दर्जेदार वर्ग आढळतात. ज्यांना समान वागणूक मिळावी हीच माफक अपेक्षा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...