कराग्रे वसते लक्ष्मिः करमध्ये सरस्वति ।
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ॥
माझ्या आईने जे सांगितलं ते मुकाटयाने ऐकाच हे मी अगदी आधीपासून केलं आणि अजूनही करत आहे. आई रोज उठल्यावर हा श्लोक म्हणायची. मीही म्हणते. आज इतक्या वर्षांनी मला नवीन गोष्ट उमगली अचानक, आणि म्हटलं लिहावं. आज हा श्लोक म्हणतांना मला ईमोजी किंवा smiley हातावर असल्यासारखं वाटलं, किंबहुना असतंच. तो आकार तसाच आहे मुळात. पण कधीही माझं लक्ष नव्हतं गेलं तिकडे अजिबातच. म्हणजे बघा न इतके वर्ष जे मी फक्त बघत होते, ते मला दिवसाची सुरवात झकास करायला शिकवतच होते पण आत्ता WA मुळे जास्त प्रकर्षाने वेगवेगळे smiley वापरतो, बोलतो, नवीन नवीन emoji ची वाट बघतो, ज्या कृत्रिम आहेत.
हा श्लोक किंवा "प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा॥..." किंवा "आपला हात जग्गनाथ..." ह्या सगळ्या म्हणजे सगळ्या म्हणी / वाक्य / सुविचार ई. आठवले मला आज. कोलगेट पण म्हणतं च ना कि "स्माईल करो और सुरू हो जाओ ...". चला तर मग मंडळी. ह्या छोट्याश्या नवीन अनुभवला घेऊन आता रोज दिवशीची सुरवात करूयात.
रविवार, १६ मे, २०२१
Smiley
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा