मी कचेरीत येतांना माझ्या एका सहकार्या सोबत येते. त्यांच्या घरापर्यंत मला रिक्षा ने जावं लागत रोज. वैविध्य स्वभावाचे रिक्षावाले असतात आणि रोजचा एक नवा अनुभव असतो. आज जो माझा रिक्षावाला होता, त्याने पंडित श्री. भीमसेन जोशी ह्यांची रागदारी लावली होती. रिक्षातून जायचं अंतर फार नसलं तरी देखील ते स्वर इतके जगावेगळे वाटले कि मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटलं. हे सहसा रिक्षा मधे बघायला / ऐकायला मिळत नाही, सिनेमाचीच गाणी लावली असतात सहसा. पण हा वेगळा होता, म्हणून पैसे देते वेळी मी विचारलंच कि "तुम्हाला श्री. भीमसेन जोशी किंवा शास्त्रीय संगीत आवडत का?" तर त्यांचं उत्तर असं होत कि ते स्वतः पदवीत्तर आहेत संगीतामधे (MA in Classical Music) पण कुठं त्या शिक्षणावर त्यांना नोकरी नाही मिळाली म्हणून ते रिक्षा चालवतात पण संगीत कानावर पडण्यासाठी आणि सराव करण्यासाठी ते शास्त्रीय संगीत ऐकतात आणि रिक्षा चालवता चालवता गातात पण. वेगळं वाटलं मला. सकाळची सुरवात वेगळीच मस्त झाली. त्या रिक्षा काकांच्या संगीताच्या प्रवासाला शुभेच्छा.
रविवार, १६ मे, २०२१
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा