रविवार, १६ मे, २०२१

पॅराडाइम शिफ्ट

आमच्या नागपुरात किंवा असं म्हणायला हरकत नाही कि आमच्या टोळक्यात, आजूबाजूच्यांकडून असं सारखं ऐकलं होत कि तोंडले खाल्यानी म्हणे बुद्धी कमी होते, चुकीचं असेल कदाचित. पण त्यावेळी गुगल बाबा नव्हता ना ताबडतोब कन्फर्म करण्याकरता. त्यामुळे ऐकीव माहितीवर विश्वास ठेवला कारण बोलणारे / सांगणारे आपलेच होते. किंबहुना माझ्या अनेक ओळखीच्यांकडे पण हि भाजी होत नसे. असो. काही का असेना, आमच्या कडे काही हि भाजी आणि शेपू आणि काही अजून भाज्या येत नसत आणि त्यामुळे मला आवड-निवड माहित नव्हती ह्या भाजीची.   

मग माझी हैद्राबाद च्या कॉलेज मधे निवड झाली एम. टेक करण्याकरता, लग्न ठरलं आणि मी ह्यांच्या घरी जाऊ लागले बरेच वेळा. मी वसतिगृहात राहत होते शिकतांना हैद्राबादला. जेव्हा जेव्हा मी ह्यांच्या घरी जात असे तेव्हा तेव्हा माझ्या सासूबाई मला पोटभर काही तरी खिलवून पाठवत असत, म्हणायच्या कि वसतिगृहात घरच नाही मिळत, खा. आणि मज्जा म्हणून सांगते आहे बहुतेक वेळा ह्यांच्या घरी तोंडलंच केलं असायचं मी जेव्हा जेव्हा गेले तेव्हा. बाप रे, मोठा प्रश्न पडत असे. "पण आता काही तरणोपाय नाही प्रीती" असं मी स्वतःला सांगत असे. नंतर सवय झाली पण, हा एक प्रसंग आठवला कि माझं मलाच हसू येत अजूनही, इतक्या वर्षानंतर देखील.
ती पॅराडाइम शिफ्ट फार वेगळी होती माझ्या करता, असो. "विनाकारण राजकारण" असं काहीस.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...