रविवार, १६ मे, २०२१

सूर्य दर्शन

म्हटलं अगदी थोडे दिवस उरले आहेत पावसाळा सुरु होण्याकरता आणि "वर्क फ्रॉम होम" सुरु आहे, रस्ता उत्तम आहे, मग म्हटलं जावं पहाटे चालायला. केली सुरवात आणि अनेक जणांनी अप्रतिम साथ दिली, प्रेरणा / स्फूर्ती दिली. त्यात माझ्या गल्लीच्या टोकाशी एका ठिकाणी असलेले असंख्य बोन्साय पद्धतीचे प्रचंड बहरलेली मोगऱ्याची झाडं आणि त्यांच्या अप्रतिम जगावेगळा सुगंध, दुसरीकडे असलेले तुळशीचे जंगल, सुबक सजवलेले लहान मोठे प्रचंड-मोठे बंगले, वैविध्य नव्या धाटणीच्या गाड्या, आंब्यांची झाडे कैऱ्यांनी बहरलेली, धावणारी व्यायामाला निघालेली मंडळी, जवळच्याच देवळातील घंटा नाद, प्रसन्न करणारी वाऱ्याची झुळूक, आकाशातील रंग, भारद्वाज, कोकिळा, आणि असे बरेच जण, पण त्यात सगळ्यात महत्वाचा म्हणजे सुर्यबाप्पा. भला मोठा नारंगी गोळा, माझ्या परतीच्या वाटेवरचा सखा, सतत दर्शन देणारा विविध बिल्डिंग च्या आडून. काय नयनरम्य दृश्य असतं म्हणून सांगते. मी हे बरेच दिवस सगळं दृश्य फक्त माझ्या डोळ्यात साठवत होते, पण एक दिवशी ठरवलं कि फोटो काढूयात. मी कधीही सकाळी फिरायला जातांना मोबाईल घेऊन जात नाही, फक्त किल्ली. पण मग दुसऱ्या दिवशी आवर्जून मोबाईल नेला, पण कसलं काय ते दृश्यच इतकं लोभस होत कि मी काही फोटो काढला नाही आणि तो मोबाईल जड वाटत होता मला हातात बाळगायला. नंतर ठरवलं कि फिरायला जातांना कशाला ओझं, मग दिवसभर आहेच कि तो माझ्या जवळ आणि मी त्याच्या. कसं काय लोक प्रत्येक वेळी ह्या नवीन अवयवाला जवळ बाळगतात कोणास ठाऊक? आशा करते कि माझं हे चालणं पावसाळ्यात देखील सुरु राहील, नवनवीन प्रेरणादायी घटक दृष्टीपथात पडतील आणि सुर्यबाप्पाचं दर्शन देखील असेच होत राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...