तर आज काय झालं कि माझा आजचा कामाचा दिवस होता, सुट्टी नव्हती. त्यामुळे मी नेहेमी प्रमाणे उठले, दूध भाजी आणि बाकी स्वयंपाकाची तय्यारी करून ठेवली आणि व्यायाम करायला सुरवात केली. तेवढ्यातच आमच्या मावशी आल्या. व्यायाम आटोपला कि मग मी सगळ्यांसाठी चहा केला. आंघोळीचं पाणी पण गरम केलं,घडाळ्याकडे लक्ष हि होत माझं. मला दिसत होत ७.४० मिनिटे झाली आहेत, तरीही मी आपली आरामात फक्त बसले होते, मावशींशी, वेदशी गप्पा मारत होते. ७. ४६ मिनिटांनी अचानक लक्षात आले कि मी काय बसले आहे, आज मला कचेरीत जायचे आहे, आणि मग जी तारांबळ उडाली म्हणून सांगते, देवा. माझं आवरलं नव्हतं, डब्बा भरला नव्हता, अचानक गडबड झाली. दोन तांबे कस्से तरी ओतले आणि झटकीपट तय्यार झाले एकदाची. पाहते तर काय माझा डब्बा भरून तय्यार होता. मी तो तस्साच उचलला आणि वेळेत पोचले कचेरीत. आज मीटिंग मुळे जेव्हा २. १५ मिनिटाने जेव्हा डब्बा उघडला तेव्हा मी उडालेच. इतका व्यवस्थित भरला होता तो, टचकिनी ओलावलेच डोळे. अगदी आई भरते ना डब्बा तस्सा. मला नं, का कुणास ठाऊक, पण, काही तरी कुडुम लागतं तोंडी लावायला. तेही दिल होत. कित्ती लक्ष ठेवतात बघा मावशी. आणि डोळे भरून येण्याचं कारण म्हणजे न सांगता त्यांनी डब्बा भरला. अहाहा. सहीच. लोणचं, चिवडे (दोन प्रकारचे), पोळी भाजी, काकडी,आणि न्याहारी सुद्धा, मोठी लगोरीच जणू (डब्ब्यांची).
खूप
मज्जा आली.
बुधवार, २ जून, २०२१
लगोरी....
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा