शनिवार, ३ जुलै, २०२१

अलिखित नियम, शिस्त आणि...

माझ्या लहानपणीपासून मला पक्कं आठवतंय कि जर घरी सगळे जेवायला बसले आहेत, तेव्हा बाहेरून कोणी आलंच तर स्वयंपाक घरात येणं वर्ज होत. बाहेरून आल्या आल्या सगळे जेवत आहेत तेथे यायचं नाही, आधी हातपाय धुवायचे, (शक्य असल्यास) कपडे बदलायचे आणि मगच प्रवेश.

त्यानंतर लहान मुलांना जेवू घालतांना पण बहुतांशी एका खोलीत आई / आजी आणि बाळ एवढेच.

त्यानंतर चा जमाना म्हणजे बाहेर खाण्याचा, मोबाईल फोन चा आणि तेव्हा पण म्हटलं जायचं कि खाण्याच्या आधी फोटो पाठवू नका. हा, मेमरीज / आठवण म्हणून काढून ठेवा फोटो पण ते अन्न सेवन करण्या आधी जमल्यास टाळा फोटो पाठवणं.

अर्थात ह्या मागे संयुक्तिक / शास्त्रीय कारण आहे, विश्वासाचा भाग आहे आणि अर्थात मी एकदा मागे लिहिल्याप्रमाणे प्रवासात किंवा अगदी गरज असेल तर बाहेर खावंच लागत, ना इलाज म्हणून पण त्याच प्रदर्शन टाळणं बरं. असो.

कुठल्यातरी सणाच्या आसपास एक व्हाट्सअँप मेसेज वाचलेलं आठवत मला. घरी चौकोनी कुटुंब असत आणि मुलगा श्रीखंडाचा डबा उघडून खायला सुरवात करतो, आई फटका देते आणि म्हणते अरे आधी फोटो काढायचा, सोशल मिडिया वर टाकायचा आणि मग खायचं, एवढं पण समजत नाही का तुला? ई. ह्या पोस्ट ची प्रकर्षाने आठवण होते जेव्हा मला असं आढळत कि संपूर्ण खाणं जे ऑर्डर केलं आहे त्याचा आधी फोटो काढायचा, टाकायचा आणि लक्ष सगळं त्या फोटोला मिळालेल्या कंमेंट्स कडेच.

मस्त प्लॅटर आधी गरम गरम एन्जॉय करा, मोबाईल खातेवेळी संपूर्णपणे बाजूला ठेवा, आपल्या माणसांशी गप्पा मारा मग विरंगुळा म्हणून थोडासा मोबाईल नंतर बघा. ते अन्न आणि बरोबरची माणसं वाट बघतात आणि बरेच जण डोकं खाली घालून मोबाईल बघतात हे जमल्यास टाळा. खाऊन झाल्यावर मग टाका रेअर क्लिकस.

आधी पोटोबा मग फोटोबा. कसं ?
#mobilephotography #photosharing #togetherness #togethernessishappiness #mobilefoodphoto #socialmedia #socialmediapost

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...