शनिवार, ३ जुलै, २०२१

चिंच भिजवणे एक कलाच

काय म्हणताय मंडळी तुम्हाला काय वाटत ह्या छोट्याश्या कृतीबद्दल?

माझ्या तरी दृष्टीने हे एक कला आहेच. कशी? सांगते, ऐका.

चिंच कशासाठी वापरली जाते, हा प्रामुख्याने लक्षात घेण्याचा मुद्दा आणि प्रश्न.
१. सध्या मराठमोळ्या आमटीत घालण्यासाठी
२. साऊथ इंडियन सांबर करण्यासाठी
३. साऊथ इंडियन चटणी करण्यासाठी
४. भाजीत / उसळीत लागली तर घालण्यासाठी
५. साऊथ इंडियन रस्सम करण्यासाठी
६. आळुवड्या च्या मिश्रणात घेण्यासाठी
७. ढोकळ्या च्या एका चटणी साठी (गोड)
८. पाणीपुरीचं पाणी करण्यासाठी
९. साऊथ इंडियन भाताचे प्रकार करण्यासाठी (भिशीभेळी, पुलीवदरा ई.)

माझ्या दृष्टीने ह्या आणि अश्या अनेक पदार्थांमध्ये चिंच घालायची असेल आणि भिजवावी लागत असेल तर किती चिंच घ्यायची आणि किती पाणी घालायचं हे बदलत हो. कारण जर ढोकळ्याची थोडीशी घट्ट चटणी करायची असेल तर थोडीशी चिंच जास्त आणि पाणी कमी, कारण दाट कोळ नंतर शिजवायला लागतो. पाणीपुरीसाठी चिंच भिजवायची असेल तर अर्थातच जास्त पाणी घालावं लागत, रादर घालावंच. किती जण खाणार आहेत, किती चटणी / पाणी करायचं आहे त्या प्रमाणात घ्यायला नको का चिंच आणि पाणी? देवा, आमच्या मावशींनी परवा एकदा मी चुकून त्यांना सांगायला आणि त्यांनी प्रचंड घोळ घातला. इतकं पाणी घातलं कि ज्याचं नाव ते, तरंगत होती बिच्चारी चिंच त्या पाण्यात. बोलून काहीच उपयोग नाही, कारण बहुतेक दुसऱ्यांदा "पुनश्य हरीओम". मी गप्प राहिले, शांतपणे चटणी केली, ती करता करता सगळे विचार गोळा केले, मोबाईल मधे साठवून ठेवले आणि लिहायला घेतलं देखील. जर मावशींनी हा घोळ घातलाच नसता तर मला अजून एक प्रसंग लिहिण्यासाठी मिळाला असता का आणि समजलं / उमजलं असत का कि "चिंच भिजवणे हि देखील एक कलाच आहे".
#tamarind #tamarindsauce #tamarindchutney #panipuri #sambar #rasam #bhishibhelibhat #soaktamarind #art

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...