माझ्या गल्लीत एक काकू आहेत ज्या अगदी नियमीत सकाळी आणि संध्याकाळी पायी चालतात, व्यायाम म्हणून. त्यांची ती सवय प्रचंड वाखाणण्यासारखी आहे. वेळ आणि तितक्या चकरा ठरलेल्या, अहाहा. खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्या कडून. श्रावण महिना सुरु झाला तसे मला एक निरीक्षणास आले कि काकू रोज भन्नाट वेगवेगळ्या साड्या नेसून सकाळी सकाळी फिरायला निघतात. मला भयंकर आश्चर्य वाटलं कारण त्या रोज फक्त तरुण पंजाबी ड्रेस घालूनच बघितलेलं आहे. श्रावणाचा इतका छान इफेक्ट मला फार भावाला. अगदी रोज मी माझ्या खिडकीत बसलेली असते माझा चहाचा कप घेऊन आणि त्यांच्या वैविध्य रंगाच्या आणि प्रकारच्या साड्या पाहून माझा दिवस फारच छान सुरु होतो. मला आधी वाटलं होत कि फक्त श्रावण चा / सिझन चा इफेक्ट आहे. पण नाही हो, सिझन सोबत ह्यांच्या साड्या देखील आहे. सकाळची शुद्ध हवा साड्यांना लाभते आहे, त्या पण अगदी खुश असतील आता नक्कीच. आणि आणखी एक, मी स्वप्नात देखील विचार करू शकत नाही पहाटे उठून, साडी नेसून, चालायला जाण्याचा. धन्य आहेत काकू आणि त्यांचा पेशन्स. ज्यांना सोप्पे सलवार कमीज घालण्याची सवय झाली आहे त्यांना पुन्हा साड्या नेसाव्याश्या वाटणं हे खूप अप्रूप आहे माझ्या साठी. सहीच. "श्रावण मासी हर्ष मानसी ........." अगदी माझ्या साठी खरं आहे. बघा कधी, कोण, कुठे तुम्हाला मोटिव्हेट करेल सांगता येत नाहीच.
बुधवार, १ सप्टेंबर, २०२१
साड्यांना हवा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा