एकदा मी ऑटोरिक्षात एका चौकात उभी होते, कारण पुढे जाण्यास लागणार सिग्नल नुकताच लाल झाला होता. त्यामुळे पुढचे दोन मिनिट तेथेच थांबावे लागले. जशी आमची रिक्षा थांबली तशी एक दुचाकी आली आणि थांबली आमच्या रिक्षाच्या शेजारी, अगदी शेजारी. आणि त्यावर दोन तरुण मुली होत्या. त्यापैकी एक गाडी थांबल्या थांबल्या म्हणते कशी "दादा$$$$, xyz ठिकाणी जाण्यासाठी कुठे वळायचं?". माझ्या रिक्षेवाल्यानी ताबडतोब सांगितलं. मी लागलीच विचारलं नागपूरच्या का तुम्ही? हो, उत्तर मिळालं लगेच आणि पुढच्या दोन मिनिटात त्या पुण्याला का आल्या, कधी आल्या, काय काम आहे ई. सगळं भराभरा सांगून झालं देखील. अहाहा. काय मज्जा आली. अनोळखी व्यक्तीला / माणसाला विचारायची हि एक अनोखी पद्धत आहे आमच्या नागपूरची. काका / अहो शुकशुक / भाऊ / आजोबा ई. किंवा काहीच नाही, डायरेक्ट विचारायचं हे नागपूरच्या पाण्यात नाहीच हो. सगळा दिवसभराचा थकवा छू मंतर. भन्नाट अनुभव.
आम्ही पुण्यात राहायला आलो तेव्हा मॉल नावाची संस्कृती फळाला आली नव्हती. त्यामुळे किराणा सामान घ्यायला छोट्या दुकानात जावं लागायचं जेथे प्रत्येक वस्तू मागितल्यावर कदाचित मिळायची उपलब्ध असेल तर. प्रत्येक वेळी बहुतेक आमची टीम जायची दुकानात काहीबाही आणायला, मी आणि माझी पिल्लं. काही दिवस फक्त आले ते दोघे माझ्या बरोबर नंतर चक्क म्हणायचे आम्ही येत नाही तुझ्या बरोबर, का म्हटलं तर, दुकानात गेलं रे गेलं कि तू मम्मा सुरु करते म्हणे "दादा$$$$ हे द्या, दादा$$$$ ते द्या.... ". बघा हो. असो.
माझ्या कॉलेज मधले सगळे स्नातकोत्तर पदवीचे आणि इतर देखील माझे दादाच. सगळे हसतात माझ्या ह्या हाकेला आणि सवयीला, पण हरकत नाही. अश्शीच आहे मी प्राऊड नागपूरकर आणि राहणार देखील नेहेमीच. "नागपूरचा विजय असो".
शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१
हाक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा