मी काही वर्षांपूर्वी एका छोट्याश्या कल्पनेवर काम केलं होतं. त्यात मनाचे श्लोक, मशीन लर्निंग आणि आज च्या काळाची गरज ह्याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला होता. आज सहज, का कुणास ठाऊक पण त्या पेपर ची मला आठवण झाली आणि म्हटलं लिहावं त्यावर काहीतरी. त्या पेपर ची थोडक्यात माहिती देणारी ppt शेअर करावी सगळ्यांसोबत ई. आणि लिहिल्या चार ओळी. ब्लॉगर वर फक्त इमेज किंवा व्हिडीओ च टाकता येतो हे बघितल्यावर मग विचार केला काय करावं? स्वःताच व्हिडीओ तय्यार करून टाकावा का? तेवढ्यात ppt उघडून सगळे मेनू बघत असतांना व्हिडीओ तय्यार करण्याचे एक ऑप्शन दिसले. ते वापरले आणि एक सुबक सुंदर मूकपट तय्यार झाला देखील, पापणी हालयाच्या आत. अहाहा च. मला अगदी जुन्या मूकपटांची आठवण झाली. चला तर मग मंडळी आता तो मूकपट बघा, समजावून घ्या आणि अमलात आणा. ह्या वरून मला एक लक्षात आलं कि कधीही कुठेही थांबायचं नाहीच, सातत्याने प्रयन्त करत राहा, शोधत राहा, मार्ग नक्की सापडेलच.
रविवार, २७ मार्च, २०२२
मूकपट
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा