शनिवार, १९ मार्च, २०२२

प्रमाण

कुठल्याही शुभ कार्यात सर्वप्रथम गणपती बाप्पांची पुजा केली जाते. तेव्हा विड्याची पानं, सुपारी ई. वर मंत्र, पुष्प आणि हळदकुंक इतकं पुरेसं असतं. त्यांचा नैवेद्य पण फारच सोप्पं, छोटीशी सुक्या खोबऱ्याची फोड / तुकडा / वाटी आणि त्यावर गुळ / गुळाचा खडा. बास. अजून किती सोप्प करायचं देवांनी सगळं नाही का?

माझ्या अगदी लहानपणीपासून मला गुळ म्हटलं कि ढेप हेच माहिती हो आणि ती पण प्रचंड मोठी, अगदी एखाद्या स्टुलासारखी. हवा तेवढा, हवा तेव्हा खा गुळ. मग हळू हळू त्या ढेपेची जागा खालील गोष्टींनी घेतली :

  • वजनाप्रमाणे ढेप, किलो, अर्धा किलो ई.
  • गुळाची पावडर साधी
  • गुळाची पावडर सुगंधी, विलायची युक्त
  • गुळाची पावडर अगदी बारीक
  • गुळाची पावडर जाडी भरडी
  • अगदी मऊ गुळ कदाचित किसलेला / चिरलेला
  • आणि आता गुळाची ढेप पण काही ग्रॅम ची पावाची किंवा तत्सम ई.


गणपती बाप्पांचा प्रसाद म्हणजे आधी म्हटल्याप्रमाणे खोबऱ्याचा तुकडा आणि गुळाचा खडा तो हि छोटासा. अर्थात तो प्रसाद शेवटी आपणच ग्रहण करतो त्यामुळे चवीनुसार गुळ खातो पण तरी देखील बारीकसा पुरे असतो.  त्यामुळे प्रसाद अर्पण करतांना सुद्धा बाप्पांना आवडेल एवढंच प्रमाणात अर्पण करतात गुळ आणि खोबरं. मधे एकदा आमच्या कडे छोटीशी पूजा होती, गुरुजींनाच सर्व सामग्री आणा म्हणून सांगितलं होत. त्या प्रमाणे ते आले, पूजा मंडळी, केली, प्रसन्न वाटलं आणि मी नमस्कार केला, दुसऱ्यादिवशी उत्तरपुजेच्या अक्षता वाहिल्या आणि आवरायला घेतलं सगळं मांडलेलं. आणि मी उडालेच. पूजा मांडली होती तेव्हा भरपूर फुलं, फळं, केळीचे खांब / पानं ई. मुळे मला दिसलं नसेल पण अहो बघते तर काय छोटासा खोबऱ्याचा तुकडा आणि त्याच्या शेजारी गुळाची छोटी ढेप. बाप रे, विजोड च होत ते. इतकी म्हणजे इतकी हसले मी ते बघून, म्हटलं काय हा प्रकार, काहीही म्हणजे काहीही करायचं का. आश्चर्य पण वाटलं. बिच्चारा बाप्पा काही म्हणत नाही म्हणून ठीक आहे, पण त्याचा अर्थ असा नाही. प्रत्येक वेळी तोलून मापून च सगळं हवं मग ते पदार्थ असो अथवा संबंध. दररोज च्या जीवनात देखील हे पाळणं आवश्यकच आहे म्हणजे "अती तेथे माती" होणार नाहीच, बॅलन्सड फ्लेवर्स फार महत्वाचे, अती गोड / खारट / आंबट / तुरट ई. नकोच. चला तर मग चविष्ट चवदार संबंध निर्माण करू या आणि टिकावू यात देखील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...