मी स्वतः गाडी चालवत असले, किंवा मागे बसले असले किंवा बस मधे मला खाली मान घालून मोबाईल बघायला अजिबात आवडत नाही, माझं सगळं लक्ष रस्त्याकडे, रहदारीकडे, दुकानांकडे. दुकानांच्या भाऊगर्दीत एक छोटा प्लॉट रिकामा होता. त्यावर एक भाला मोठा बोर्ड लावला होता, सूचना होत्या अस्खलित मराठी मधे, काळ्या रंगाच्या बोर्ड वर पांढऱ्या रंगानी लिहिलं होतं, जशी कि "काळ्या दगडावरची पांढरी रेघ". बाकी काय मजकूर होता ते मला माहित नाही कारण गाडीतून जातांना मी पट्टाकिनी वाचला तो, पण एक भारी स्टाईल मधे लिहिलेलं मी बघितलं. त्या शब्दाकडे / शब्दाने माझं लक्ष वेधलं गेलंच कारण तो शब्द होता "हुकुमावरूण". पोटधरून हसले, आवडलं मला. अहाहा. अगदी संपूर्ण प्रोसेस डोळ्यासमोरून गेली, ज्याने लिहिलं असेल, तो बोर्ड करायला दिला असेल, ई. सगळेच महान. अहाहा.
अजून एक नेहेमीच दृष्टीपथात पडणारा बोर्ड म्हणजे "जेवन तय्यार आहे".
इतकी वर्ष अगदी लहानपणापासून घरी, दारी मराठमोळं वातावरण, शिक्षण देखील त्यातच, त्यामुळे हि गल्लत ण आणि न ची लई भारी वाटली मला, म्हटलं पेरावं, वाचकांना पण असे प्रत्यक्ष बोर्ड बघण्याची गरज नाही आता. मला माहिती असलेल्या शुद्ध मराठीच अप्रूप वाटल्याशिवाय राहवलं नाही. धन्य ते सगळे शिक्षक, त्यांची क्वचितच हातावर पडलेली छडी, त्यांची शिस्त आणि घरी देखील सातत्याने कानावर पडलेले, स्मृतीत राहिलेले स्पष्ट उच्चार आणि भाषेचं महत्व देखील. छोटेसे दोन शब्द ते काय दिसले मला रस्त्यावर, चूक म्हणून नाही पण माझ्या चार डोळ्यांनी ते टिपलं आणि म्हटलं लिहावं. स्वच्छ शुद्ध भाषा येते आहे हे देखील फार समाधान देऊन जाणार आहे, चला तर मग शोधूया अजून असे कंगोरे जे आपल्याला / प्रत्येकाला प्रचंड समाधान देतील.
शुक्रवार, १८ मार्च, २०२२
ण आणि न
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा