गाडी चालवणे ह्या कलेबद्दल तर मी आजन्म लिहू शकते, कारण ते माझं प्रेम आहे, अगदी माझ्या हृदया जवळच असं. प्रत्येक वेळी मला माझ्या राणीची नव्याने ओळख होते जेव्हा जेव्हा मी तिच्या सोबत असते, भन्नाट मज्जा येते तिच्या सोबत आणि ती वेगळीच आहे, शब्दात मांडण्याची बांधिलकी नकोच. असो. तर आता माझी लेक मोठी पण झाली, गरज पण आहे आणि तिला आवड पण, अर्थात मला तिला चालकाच्या जागी बसलेलं बघायचं आहे, तिच्या सोबत बाजूला बसून इथे-तिथे जायचं आहे, हुंदडायचं आहे, भरपूर, पोटभर.
मी मागे एकदा लिहिल्या प्रमाणे पहिल्यांदा मोडक्या बाबा आदमच्या जमानातल्या जुन्या गाडीवर मी शिकले चालवायला, क्लास लावला होता. चटकिनी शिकले आणि त्यानंतर आजतागायत भरपूर आकाराच्या प्रकारच्या गाड्या चालवल्या, उपभोगल्या म्हणायला हरकत नाही. अर्थात मधे एक छोटा काळ मी दूर होते त्या पासून पण आता नाही. असो.
त्यानंतर पुन्हा एकदा एका अनुकथेत मांडल्या प्रमाणे आजकाल तर ऑटोमॅटिक नवीन कोऱ्या पॉश गाड्यांवर नवशिखे चालवतांना / शिकतांना दिसतात, काय बदल घडलाय, अहाहा. मस्तच.
परवा पुन्हा एकदा माझ्या राणी सोबत ऑफिसला जात असतांना एक जाहिरात ऐकली. एका विख्यात ड्रायव्हिन्ग स्कूल ची होती ती. ते म्हणे आधी सिम्युलेटर वर संपूर्ण गाडी चालवायला देतात आणि त्यात गोडी निर्माण झाली, हात बसला कि मग प्रत्यक्ष रस्त्यावर चालवायला देतात म्हणे. मी ताबडतोब माझ्या लेकीला फोन लावला आणि शोधायला सांगितलं ती संस्था कुठे आहे, फी किती आहे, क्लास कधी सुरु होतोय ई.. सर्वात नवीन तंत्रज्ञाची अशी सोय असेल तर काय हरकत आहे अनुभव घ्यायला. कित्ती मस्त ना, मला खरंच अजून एकदा अश्या पद्धतीने गाडी शिकायला आवडेल नक्की. कारण दोन्हीच्या मी प्रेमात आकंठ बुडालेली आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गाडी चालावणं, मग काय विचारात. मुली सोबत मी पण तरुण होऊन जातेच, बघूया तर तो अनोखा अनुभव घेऊन. काय काय निघेल नव-नवीन, अप्रतिम आणि वाखाणण्यासारखं. गाडी चालवणे म्हणजे माझ्यासाठी सक्रिय ध्यान / ऍक्टिव्ह मेडिटेशन च आहे हो. कदाचित फारच प्रेमाने मी शिकायला सुरवात केली, शिक्षक - रस्ते आणि शिकवायची पद्धत फार अप्रतिम होती, माझ्यावरचा त्यांचा भरवसा वेगळाच होता आणि त्यानंतर सातत्याने चालवायला मिळत गेलेल्या गाड्या, स्वातंत्र ह्या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे जसे काही रोजचे ऍक्टिव्ह मेडिटेशन च. प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट अश्या प्रेमाने सुरवात केली शिकायला, अमलात आणायला तर कित्ती जग वेगळं होईल ना? चला तर मग आताच लगेच सुरु होऊ या, आणि वेगळ्या जगाचे साक्षिदार होऊ या.
शुक्रवार, १८ मार्च, २०२२
वाखाणण्यासारखं मस्त काहीतरी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा