माझा एकुलता एक लाडका, थोडासा जिद्दी आणि आळशी म्हटलं तरी चालेल, असा लेक. लहानपणी पासून झोपेशी फार दृढ नातं त्याच. बाकी कोणाशी काही घेणं देणं नव्हतंच, पालथं होणं नाही, समोर सरकण्याचा प्रयत्न नाहीच, ई. थोडेसे महाराज मोठे झाले तर घसरगुंडी वगैरे खेळण्याची फारशी आवड नाही. यथेच्छ खायला द्या, वैविध्य पदार्थ ते हि, चमचमीत मग स्वारी खुश. शाळेच्या आधीच्या दिवसात परीक्षेत काही उत्तर आठवलं नाही तर भाऊ घरी येऊन सांगत असतं कि मला तो प्रश्न अजिबात समजला नाही आणि तो मी लिहला नाही, सोडून दिला. आणि त्याबद्दल मला खूप त्याच कुतूहल वाटतं असे. जे आहे ते तो स्पष्ट सांगतोय तरी घरी येऊन. असो. मग थोडासा काया पालट होतांना दिसला, जशी जशी ९-१० आली. आणि आता साहेब चक्क एकटे वसतिगृहात राहून डॉक्टर होण्याच्या मार्गावर आहेत. प्रगती ह्या पेक्षा अजून काय असते. हा कोणाची भली मोठी कोणाची छोटीशी. असो. लवकर हे ४.५ वर्ष सरोत आणि तो त्या मोठ्या पांढऱ्या कोटात मला नजरेस पडो, त्याच्या हातून त्यांनतर बरेच लोक सुदृढ राहोत हि ईशचरणी प्रार्थना.
थोडसं लवकर उठले तर कॉमन बाथरूम रिकाम्या असतात, रांगेत लागावं लागत नाही, त्यामुळे कुंभकर्ण असून चालणार नाहीच, अर्ली बर्ड शिवाय पर्याय नाही. पडेल अंगवळणी हळू हळू.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा