रविवार, २७ मार्च, २०२२

निद्रा

रात्रीची शांत झोप, सलग काही तास हि प्रत्येक मनुष्याला अत्यावश्यक आहे, एकंदरीत त्याच्या वाढी करीता, उर्जे करीता आणि पुढील दिवस उत्साहाने सुरु करण्याकरता. आपल्या देशात, धर्मात आणि परंपरेनुसार निद्रेला देखील देवीची उपमा दिली आहे, किंबहुना निद्रेची देवी आहे आणि तिच्या कृपाप्रसादामुळे सर्वांना शांत झोपेची अनुभूती येते हे निश्चित.

हि पार्शवभूमी माहित असल्यामुळे सहज परवा मला एक प्रश्न पडला म्हणता येईल आणि त्याचं उत्तर देखील सापडलं असं म्हणता येईल. त्याचं असं झालं कि निद्रा देवी सगळ्या गोंडस बाळांना अप्रत्यक्ष पणे ओंजारून गोंजारून झोपवत असेल. त्या निसर्गरम्य दृश्याकडे / गोंडस बाळाकडे  बघूनच ती निद्रा देवी झोपेचा उपहार देऊन टाकत असेल. तसेच कष्टकऱ्यांचे, सुरकुतलेल्या हाताचे / चेहेऱ्याचे दृश्य पाहून देखील गाढ निद्रेचा शुभाशीर्वाद मिळत असेल, देत असेल. मला माफ करा ह्या माझ्या काल्पनिक शब्दांसाठी, पण निद्रादेवी हि एकदाच आशीर्वाद देऊन मोकळी होत असेल किंवा निद्रादेवींच्या बाकी सख्या विविध ठिकाणी जात असतील किंवा जशी अगदी लहान मुलांची देवी असते, त्या प्रमाणे वयानुसार देवीचे वायुवेगाने भ्रमण होत असेल. शांत झोप मिळणे हा भलामोठा आशीर्वाद आहे आणि त्या करता सर्वांनी थोड्याश्या गोष्टी केल्या कि हे सहज साध्य होईल. फक्त कामाशी काम ठेवा, उगाच सल्ले नकोत, दुसऱ्यांच्या भानगडीत पडावं लागेल एवढा वेळ मोकळा असू देऊ नका, कामात झोकून द्या स्वतःला, थोडासा व्यायाम करा, समाज कार्य करा, घरची कामं उचला / आटपा, व्यव्यस्थित आनंदाने अन्न ग्रहण करा, नतमस्तक राहा ई. आणि मग बघा आशीर्वाद कसा मिळतो ते आणि निद्रेच्या स्वाधिन कसे होता ते.

 Others views on deep, sound night sleep: 

https://hindupad.com/nidra-devi/

https://www.britannica.com/topic/Hypnos

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...