रविवार, २७ मार्च, २०२२

बायो डेटा vs सिव्ही


सातत्याने प्रत्येक नवीन कन्सेप्ट शिकवतांना किंवा शिकवणे सुरु करतांना / करण्याच्या आधी मी माझ्या विद्यार्थ्यांना त्या कन्सेप्ट चा उपयोग काय / कुठे / कधी आणि का केला जातो हे वैविध्य उदाहरणं देऊन समजावून सांगते. मलाच बरं वाटतं त्यामुळे.  हायसं वाटतं कि मुलांना आधी पार्श्वभूमी समजली कि मग शिकवायला सुरवात.  माझ्या काही विद्यार्थ्यांना मी एकदा विचारलं बायो आणि सीव्ही ह्यातला फरक काय? कारण हि दोन्ही वेगळी उदाहरणं आहेत, वेगळ्या कामासाठी वापरली जातात आणि ती संगणक संज्ञा वापरून वेगळ्या पद्धतीने उभी करावी लागतात. त्यामुळे म्हटलं ह्या सोप्या उदाहरणापासून सुरु करू या. आणि काय महद आश्चर्य मुलांनी हे शब्द ऐकले तर होते, पण त्यात फरक आहे हे त्यांना ठाऊक नव्हतं. मी उडालेच. म्हटलं अरे त्यांच्या नावावरून तर अंदाज बांधा, प्रयत्न करा, काही तरी सांगा, पण नाही. मग मी हलक्या फुलक्या शब्दात हिंट दिली तर मग सगळे पोपट बोलायला लागले. एक नोकरी मिळवण्यासाठी तर दुसरं छोकरी, हा काय तो फरक आहे. मोठा हशा पिकला वर्गात आणि मग चर्चा सुरु झाली दोन्ही तांत्रिक आणि बाकी बाबतीत देखील. तर असे माझे भन्नाट विद्यार्थी. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...