रविवार, २७ मार्च, २०२२

मातीचा सुगंध

प्रत्येक पाऊस हा पहिला पाऊसच असावा असं मला कायम वाटतं. उन्हाळा संपला आणि पावसाळा सुरु झाला / होणार आहे ह्याची चाहूल लागते जेव्हा काही तुरळक सरी येतात, दूर कुठेतरी पण त्या वेळी जो मातीचा अप्रतिम सुगंध येतो, त्याला शब्दात बांधणं म्हणजे गुन्हाच आहे, ठरेल. अगदी अवेळी असं झालं काही दिवसांपूर्वी. अचानक वातावरणात बदल जाणवला आणि पाय मोकळे करायचे म्हणून मी माझ्या केबिन च्या बाहेर पडले तर माझा आनंद गगनात मावेना. इतका अप्रतिम जगावेगळा सुगंध येत होता, थोडासा पाऊस पडला होता आणि तापलेल्या त्या मातीवर, त्यामुळे जो घमघमाट सुटला होता म्हणून सांगते, मला ताबडतोब माती खायचीच इच्छा झाली. इतकी तीव्र इच्छा झाली कि मी कसं मला आवरलं ते माझं मला ठाऊक. त्या वेळी माझ्या आजूबाजूला जीवशास्त्र आणि तत्सम अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी होते आणि त्यांनी एक शब्द उच्चारला पेट्रीकोर. तो मला इतका भावाला, आणि कदाचित माझ्या चेहेऱ्यावरचे भाव, माझी देहबोली ई. त्या विद्यार्थ्यांना इतकी आवडली कि त्यातली एक PhD करणारी विद्यार्थिनी सांगायला लागली कि तिचा मास्टर लेव्हल चा प्रोजेक्ट म्हणजे पेट्रीकोर तय्यार करणे असा होता. आणि ती १०० टक्के यशश्वी झाली होती. बरोबर संध्याकाळच्या वेळी जेव्हा बहुतांशी सगळे थकलेले असतात दिवसभर अभ्यास करून, प्रयोग करून, उभं राहून ई. तेव्हा मी त्या लॅब मधे माझ्या प्रोजेक्ट चे झाकण उघडायची. बास मग काय, इतका हुबेहूब सुगंध यायचा ओल्या मातीचा कि सगळे जण प्रसन्न होऊन जायचे आणि मला समाधान लाभायचे ते वेगळेच. पेट्रीकोर कसं तय्यार करतात ई. तिने मला सगळं समजावून सांगितलं. तेव्हा मला वाटलं असा रूम फ्रेशनर का नाही तय्यार करत कोणी? कित्ती नैसर्गिक आणि किती वेगळा सुगंध, त्यामुळे काय भन्नाट वातावरण निर्मिती होईल. आताशा नाही तरी फळं, भाज्या, आणि इतर गोष्टी क्रतू प्रमाणेच मिळतात असं नाहीच. अवेळी, अचानक असा अप्रतिम सुगंध चाखायला मिळालं तर किती मज्जा येईल, फक्त विचार करा मंडळी. एकंदरीत पेट्रीकोर ची प्रक्रिया, प्रोसेस मला मनापासून भावली. आणि ह्या विद्यार्थिनीला ते लॅब मधे तय्यार करण्याची संधी मिळाली, अहो भाग्य. 

To know the scientific details, kindly visit following URLs:

https://www.acs.org/content/dam/acsorg/education/students/highschool/chemistryclubs/infographics/petrichor-the-smell-of-rain.pdf

https://www.bbc.com/news/science-environment-44904298

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...