बुधवार, २३ मार्च, २०२२

चमकी

मी नागपूरला खूप दिवसांसाठी मोठ्या कामासाठी जाणार म्हणून माझ्या ह्यांनी खास माझ्यासाठी दोन नवीन ड्रेस आणले आणि ते फारच अप्रतिम आहेत, अर्थातच म्हणावं, इतके विशेष आहेत कि जसे कि ते फक्त माझ्याचसाठी तय्यार केले होते. त्यातल्या त्यात एक तर लईच भारी, ज्याचं नाव ते. कारण त्याचा पॅटर्न, कापड, स्टाईल आणि विचारूच नका. त्या ड्रेस वर सगळीकडे मस्त छोटेखानी चमकी आहे. त्यामुळे देखील तो उठून दिसतो घातल्यावर, जरी चमकी न-दिसणारी असली तरी. पहिल्यांदा तो ड्रेस घातला तेव्हा दिवसभर खूप मिरवला आणि घरी संध्याकाळी येऊन बघते तर काय सगळ्या हाताला, मानेला ती चमकी लागली होती. त्यामुळे चेहेरा, हात वेगळे आणि छान बदलेले दिसत होते, मला छान वाटलं बघून. त्यानंतर घातला पुन्हा काही दिवसांनी तर माझ्या ऑफिस मधल्या काळ्या खुर्चीला लागली सगळी चमकी, अहाहा, अगदी जसे कि ती खुर्ची मला बोलली, तीच मनोगत व्यक्त केलं कि तिला देखील मेकअप केल्याची जाणीव होते आहे कधी नव्हे ते आणि दिवसभर तिच्यातला बदल मला खूप जाणवला. अहाहा च.

इतक्यांदा धुवून, इस्त्री करून देखील प्रत्येक वेळी तो ड्रेस घातला कि मला पण हाय लाईट्स वगैरे वापरून मेकअप केलाय, हातांकडे खास लक्ष दिलंय असं काहीसं वाटत. माझेच तेच हात मला वेगळे, तरुण आणि सजलेले वाटतात / आढळतात. वा. अप्रतिम. शब्दात मांडणं अतिशय अवघड आहेत हे अनुभव, पण प्रचंड उभारी देऊन जातात मनाला आणखीन काय हवंय नाही का मंडळी.

तर ते कापड ज्यांनी विणलं, तय्यार केलं ते कारागीर, ड्रेस शिवला तो टेलर, दुकानदार, आमचे हे ह्या सर्वांना मनापासून धन्यवाद. मला कधी काय आढळेल आणि आवडेल आताशा काही सांगता येत नाहीच. जेव्हा जेव्हा मी तो ड्रेस परिधान करते तेव्हा तेव्हा "आज मै उपर, आसमा नीचे..." किंवा / आणि "दिल ने कहा चुपके से, ये क्या हुआ चुपके से ...." असं काहीसं जाणवत माझंच मला.  


त्या अद्धभुत चमकीचा विजय असो, जियो चमकी जियो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...