फक्त म्हणजे फक्त डोळ्यासमोर आणा आणि विचार करा मंडळी कि सकाळी ऑफिस ला पोचायचं आहे, ड्राइवर कुठेही दूरवर दृष्टीपथात नाही आहे, तो कधी उगवणार माहित नाही, फोन उचलत नाही ई. मग मीच गाडी चालवायला बसले म्हटलं जावं थोडं अंतर मग येईल ड्राइवर आणि काय विचारात एक नवीन गाणं अचानक सुरु झालं. आणि मी कधी गुंग झाले त्या गाण्याच्या धून मधे माझं मलाच समजलं नाही. अहाहा च. सगळं राहिलं बाजूलाच, ऑफिस, ड्राइवर, काम, आणि बरेच काही. मग काय अवतरले महाराज, गाडी ची सूत्र घेतली हातात, मी कानात इअरफोन घालून, युट्युब वर शोधून ऐकायला सुरवात केली देखील पुन्हा पुन्हा. का ते गाणं नाही म्हणता येणार, शब्द तर नाहीतच, पण धून भिडलीच डायरेक्ट, वा.
ऐका आणि सगळं विसरा काही क्षण मंडळी...
https://www.youtube.com/watch?v=fslhKaNZZPc
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा