माझ्या मते सहा एक महिने झाले असतील माझ्या दररोजच्या जाण्या येण्याच्या रस्त्यावर एक नवीन, कोरं, करकरीत काही तरी माझ्या नजरेस पडलं. म्हटलं वा, फारच सुंदर, आकर्षित करणार असं, चांगलं बांधलंय ई. विचार मनाला शिवून गेले. मग काय नकळत मान वळू लागली त्या दिशेला दररोज जाता येता. ती म्हणजे एक सुबक सुंदर लहान मुलांची नवी कोरी रंगीबिरंगी शाळा सुरु केली आहे. असं वाटतं ना आता जावं आणि सगळे खेळ खेळावे, हुंदडावं अहाहा. अहो लहानपणी तर अनुभवलंच सगळं पण तेव्हा अक्कल नव्हती, त्यामुळे आनंद उपभोगता येईल आता म्हणून वाटतं खरं. असो पण त्या इमारतीला तर सध्या भली मोठी कुलुपं लागली आहेत. ह्या दिवसात अशी गुंतवणूक केलेली बघून जरा आश्चर्यच वाटलं मला. पण माणूस हा नेहेमी आशेवर जगतो त्यामुळे आशा करूया कि नॉर्मल दिवस, ते नेहेमीचे दिवस पुन्हा सुरु होतील सुरळीत लवकरच, लहान मुलं त्यांच्या शाळेत त्यांच्या सवंगड्यांसोबत पुन्हा एकदा मस्ती करतील आणि शाळेची इमारत देखील खळखळून जगेल पुन्हा एकदा त्या पिटुकल्या पावलांना अनुभवून, ते बोल ऐकून, ते स्पर्श, ते खेळ आणि बरंच काही शब्दांविना अनुभवावं असं सगळं.
बुधवार, २३ मार्च, २०२२
पुन्हा एकदा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा