शनिवार, २६ मार्च, २०२२

लग्न सोहोळा

परवा अनेक अनेक वर्षांनी मी प्रत्यक्ष लग्न सोहोळा "ह्याची देही ह्याची डोळा" अनुभवला. फारच अप्रतिम सजावट केली होती, फारच विचारपूर्वक सगळं मांडण्यात आलं होत. हॉल अप्रतिम च होता, आणि अगत्य तर विचारू नकाच. सासू-सासरे होण्याचा आनंद झळकत होता दोघांच्या डोळ्यात, मेहेनतीत, ओसंडून वाहात होता म्हटलं तरी चालेल. प्रत्येक येणाऱ्यांची मनापासून विचारपूस, गप्पा, फोटो, हास्याचे फवारे आणि विचारूच नका. अहाहा च. साधी पण उत्कृष्ट वेशभूषा, केशभूषा सर्वांचीच. जेवणाचा बेत भन्नाट, चविष्ट आणि खासच. सगळंच मनाला फार भावलं ह्यात शंकाच नाही. लग्न हे एक पिटुकलं निमित्य होत माझ्या साठी, माझ्या मित्र-मैत्रिणीसाठी, त्या वधूने आम्हाला भेटण्याचा एक सुरेख मोक्का दिला होता आणि आम्ही त्याचा पुरेपूर फायदा घेतला, अर्थात जरी थोड्याच वेळ होतो एकमेकांसोबत पण ते पोटभर नसलं तरी खूप खूप छान होतं, हवं हवंस अनेक वर्षांनंतर आलेलं. अजून एक खासियत अशी कि २००७ च्या दरम्यान बहुतेक आम्ही त्याच कार्यालयात एका लग्नाला गेलो होतो आणि मी आज पुन्हा १५ वर्षांनी गेले तेथे, कायापालट झाला आहे त्या जागेचा, हॉल चा, स्वयंपाकाचा आणि इतर सुविधांचा. अहाहा. संपूर्ण चकाचक तो भलामोठा हॉल, अतिशय नवीन पद्धतीने सजलेला, नटलेला, उत्कृष्ट खुर्च्या, भिंतींचे रंग आणि सजावट, वातानुकूलित, लिफ्ट्स, हैड्रॉलिक पार्किंग ची सोय आणि बरेच काही. प्रसन्न वाटलं नाही तर नवलच. हॉल व्यावसायिक असल्यामुळे हे होणं साहजिकच आहे, पण असा वेळेनुसार, गरजेनुसार आणि सोईनुसार आपण देखील स्वतः हा साठी कायापालट करत राहिला पाहिजे, स्वभावात, वागण्यात, बोलण्यात, समजावून घेण्यात ई. नाहीतर मग मोठं होणं म्हणजे काय ना? सगळ्यांना आनंद देऊ यात आणि नवीन कात पाघंरुया. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...