शनिवार, २६ मार्च, २०२२

मोगरा फुलाला ...

चार एक वर्षांपूर्वी मी एक पिटुकलं मोगऱ्याचं रोपटं आणलं आणि एक छोट्या कुंडीत लावलं माझ्या अंगणात. आणि जशी उन्हाळ्याची चाहूल लागली तसे हे रोपटं बहरलं कि कळ्यांनी. त्यानंतर पिटुकली पण भरपूर फुलं आली त्या झाडाला. अप्रतिम सुगंध देऊन गेली, मनाला एक वेगळा बहार पण देऊन गेली आणि माझी पहाट ह्या सुगंधानेच होऊ लागली, जो वर फुलं होती तोवर. पहाटेच्या गार वाऱ्याची झुळूक आणि त्या सोबत हा अप्रतिम जगावेगळा फक्त ह्याच ऋतूत अनुभवता येणारा सुगंध म्हणजे "आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन" अशी परिस्थिती होत होती माझी. आता ते रोपटं मोठं झालयं आणि ते वेलीसारखं वाढण्याचा प्रयत्न करत आहे. अगदी हडकुळं, बारीक फांद्या, अगदी छोटी दुर्मिळ पानं पण नखशिखांत बहरलं आहे कळ्यांनी, फुलांनी. अहाहा च. किती म्हणजे किती शिकण्यासारखं आहे. फार भक्कम आधार नाही, खूप पानं नाहीत, ऊन म्हणतंय मी, खूप काही देखभाल नाही (अधेमधे पाणी आणि उकरणं एवढंच) पण तरीदेखील कोणाची आणि कशाचीही परवा न करता मुक्तपणे इतकं जास्त बहरलं आहे कि ज्याचं नाव ते. इतका प्रचंड आनंद देतोय बघणाऱ्यांना आणि सुगंध उपभोगणाऱ्यांना वा. असेच आपण देखील न थांबता, न थकता, न वाट बघता कोणाची, कोणाच्या आधाराची, प्रशंसा / प्रशस्ती पत्राची ई. बहरतं राहील पाहिजे नेहेमी. हे मोगऱ्याचे झाडं स्वतः आनंदी आहे त्यामुळे दुसऱ्याला आनंद देऊ शकतात. तसेच स्वतः नेहेमी प्रसन्न, आनंदी, समाधानी आणि त्यामुळे उत्साही राहा, स्वतःचा सुगंध आणि बहरामुळे दुसऱ्याला नकळत मार्गदर्शन करत राहा. इतकुसं ते झाड पण सुगंधाशिवाय अजून कित्ती काय काय शिकवून जातंय बघा मंडळी. "असा बहर येई आणि स्मृती ठेवुनी जाई".

अजून एक लेखिकेने मोगरा फुलाला ह्या भक्तिगीतांचा अर्थ मांडला आहे, तो देखील जरूर वाचा, त्यात देखील खूप अप्रतिम पद्धतीने मनाचे धागे आणि विठ्ठलाविषयी कल्पना मांडली आहे.  https://www.shivpreetsingh.com/2020/04/mogara-phulala-spring-poem-by-sant.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...