गुरुवार, ६ जून, २०२४

आदरणीय बहिणाबाई


मला अनेक अर्थपूर्ण कार्यक्रम बघायला आवडतात दूरदर्शनवर. हे कार्यक्रम म्हणजे कधी संपूर्ण पल्ल्याचे चित्रपट मराठी, हिंदी किंवा इंग्लिश भाषेतले, लघुकथांवर आधारीत लघुपट, विद्यार्थ्यांनी तय्यार केलेले छोटेपट, विविध दिग्गज कंपन्यांच्या जाहिराती, मुलाखती ई. खूप म्हणजे खूपच जबरदस्त शिकवून जातात हे सगळे कार्यक्रम मला, अत्यानंद मिळतो तो निराळाच. तर अशी मी, एक शाब्दिक मेजवानी उपभोगत होते इतक्यात. त्यात आदरणीय बहिणाबाईंचा संदर्भ दिला गेला. अर्थात त्यांनी खूप डोंगराएवढं मोठ्ठं काम करून ठेवलं आहे त्यातील एक वाक्य ऐकवले गेले संदर्भ म्हणून. ते असे होते कि "मुलीला माहेर लाभावं म्हणून माय सासरी जाते". चट्टकिनी डोळ्यात पाणी उभे राहिलेच माझ्या. किती छोटेसे वाक्य पण संपूर्ण सार कथन करून गेले. ह्या साराची पात्र होती आई, लेक, आयुष्य, पिढ्या, सासरकडची वागणूक, माहेरची आठवण, आपली माणसं, जुळवून घेणं, अथक कार्य सुरु ठेवणं आणि पेरणं. आई संबंधी असे बोल मी पहिल्यांदा ऐकले आणि कृतार्थ व्हायला झाले. "आई कुठे काय करते?" हा प्रश्न ज्यांना पडतो किंवा भविष्यात पडेल त्यांचा वरचा मजला रिकामा नसेल तर त्यांना हे उत्तर मिळेल. माहेर घडतं हे माहिती होतं पण आता निश्चित झालं. ते कोणामुळे खास करून आणि ते देखील लाडक्या लेकीसाठी? हे उमजले. आईचा सहवास, तिचे अस्तित्वच पुरेसे असते. 


सगळं जग तंत्रज्ञानाच्या नावाने जरी खडे फोडत असले तरी माझी एक खास मैत्रीण नेहेमीच त्याची तारीफ करत असते. ती म्हणते माझ्या आई वडिलांना, मित्र मैत्रिणींना, प्रेमाच्या माणसांना "ह्याची देही ह्याची डोळा" बघता येत, मनात येईल तेव्हा ह्याच तंत्रज्ञानामुळे. त्यामुळे त्यांचा जसा काही सहवास लाभतो आहे दूर असून सुद्धा हे अनुभवता येतं, ह्या पेक्षा अजून काय हवं आहे. क्या बात है? नाही? अशी ती आई, किंवा आई समान व्यक्ती, ज्या नकळत, किंवा अदृश्य असे खूप काही पेरत असतात, कार्यमग्न असतात, उहापोह न करता. अश्या सर्व माउलींना आणि आदरणीय बहिणाबाईंना मानाचा मुजरा आणि नमस्कार. सगळ्यांचा आदर द्विगुणित झाला किंवा पटीने वाढला आता माझ्या देखत.   

२ टिप्पण्या:

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...