सोमवार, २४ जून, २०२४

संशोधनाची पहिली छोटी पायरी

 नवीन लोणचे घातले कि त्यात सुरवातीला भरपूर प्रमाणात तेल घातलेले असते. ते जास्तीचे तेलाचे आणि मीठाचे प्रमाण प्रिझर्वेटिव्ह चे काम करते, लोणचे टिकवून ठेवायला जणू. पण तो खार जास्त महत्वाचा असतो, कित्येक जणांना, मला धरून हो. नव्या कोऱ्या लोणच्याचा खार आणि गरम मऊ भात, अहाहा च. अप्रतिम असे ते मिष्टान्न तय्यार होते. वाढायला सोप्पे म्हणून थोडे लोणचे छोट्या बरणीत काढले जाते. तेव्हा काही दिवसांनी त्यात पुन्हा पुन्हा फोडणी घालावी लागते, अर्थात ह्या वेळी चव वृद्धिगत करण्यासाठी किंवा खार वाढण्यासाठी. फोडणी करून ती थंड व्हावी लागते लोणच्यात घालण्याआधी पुन्हा पुन्हा. त्यामुळे जरासा वेळ लागतो हे करायला आणि संयम लागतो तो वेगळाच. परवाची गोष्ट. लोणचे कोरडे झाल्यासारखे दिसले, म्हटलं फोडणी घालणं आता अत्यावश्यकच आहे. पण भूक लागली होती. आता काय करायचं? थोडेसेच लोणचे उरले होते छोट्या रोजच्या बरणीत. आणि माझ्या चार डोळ्यांना तेव्हाच काही वेळापूर्वी काही जिन्नस तळून ठेवलेली कढई दिसली. म्हटलं चला. एक छोटासा नवीन प्रयोग करून बघुयात आज. फोडणी तर नेहेमीच घालतो, आज तळेलेले तेल जे थंड झाले आहे ते घालून बघुयात. मग काय, घातले आणि फस्त केले देखील. फोडणीची सर नव्हती त्याला पण "दुधाची तहान ताकावर" अशी पर्वणी साधता आली मला सहज आणि ताबडतोब, न वाट पाहता, तेल / फोडणी थंड होण्याची हो. फोडणीत जरी मोहोरी, हिंग हळद तापलेल्या तेलात घातलेले असले तरी तापलेले तेल जास्त प्रमाणात असते आणि महत्वाचे असते. सगळं माल मसाला मुरलेला असतोच आधीच त्या लोणच्यात त्यामुळे जास्तीचे, संपवलेले तेल घालणे महत्वाचे. हा साधा विचार केला आणि कृती करून मी मोकळी झाले. हे सगळं अर्थात माझी लेक बघत होती आणि तिने तिच्या डोक्यावर हात मारला. बास. 


तर मंडळी अश्या छोट्या छोट्या क्लुप्त्या करून बघाच हो, काय भन्नाट मज्जा येते ते. वेगळं काही तरी पानात वाढलं जातं आणि त्याची चव काही निराळीच मिळते / लाभते. ह्यालाच तर संशोधनाची पहिली छोटी पायरी म्हणायला हरकत नाही किंवा काम साध्य करण्याची वेगळी पद्धत, नाही का? 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...