गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

वातावरण निर्मिती....

प्रकर्षाने बघितलं तर बाहेरील देशात जर अगदी लहान मुलाला, म्हणजे ५-६ महिने किंवा वर्षाच्या आतल्या बाळाला जर लस द्यायची असेल तर आधी डॉक्टर त्याच्या बरोबर खेळतात, खेळण्याकरता त्यांच्या कडे खेळणी असतात आणि मुख्य म्हणजे आवड असते. आणि खेळीमेळीत कधी इन्जेक्शन दिल जात हे कळत देखील नाही. काय भन्नाट आहे नाही हे सगळं. मला तर फा$$$$र मनापासून आवडतं.

आमच्या वरती बिल्डिंग मधे एक आजी येतात स्वयंपाक करायला, काटेकोर पणे वेळ पाळत आणि त्या आल्या कि आधी चहा करणार, मग संपूर्ण ओटा साफ करणार आणि त्याच ठरवणार काय करायचं ते, काल झालं नाही ते, काय सामान उपलब्ध आहे ते ई. बघून.  चहा पिल्याशिवाय आणि ओटा साफ केल्याशिवाय त्यांचं पान हालत नाहीच. स्वच्छ ओटा बघितला कि त्यांना हुरूप येतो आणि झक्कास स्वयंपाक करतात.

योग किंवा अजून कुठलाही व्यायाम करण्या आधी  स्ट्रेचिंग व्यायाम करतात, तय्यारी करतात, कोणी गाणी किंवा संगीत सुरु ठेवतात. ध्यान करण्याआधी शिथिलतेवर भर द्यावा लागतो, स्वाशावर लक्ष केंद्रित करावे  लागते, सुगंधी उदबत्ती किंवा अगदी शांत संगीत सुरु करतात ई. शिक्षक शिकवायला सुरु करण्या आधी उजळणी घेतात, गप्पा मारतात, प्रेरणा देणाऱ्या आणि उपयुक्त अश्या छोट्या गोष्टी सांगतात. देवा...

माझ्या दृष्टीने  वरील नमूद केलेले सर्व उदाहरणं हे "वातावरण निर्मिती" चे आहेत आणि अशी असंख्य अजून असतील. आणि हि सर्व उदाहरणं हे दर्शवतात कि "वातावरण निर्मिती" हि एक कला आहे. आणि सगळ्याच क्षेत्रात / प्रांतात वातावरण निर्मिती झाल्याखेरीज पर्याय नसतो किंबहुना काम दर्जाचं, सहज-सुलभ होत नाही. आज मी ह्या विषयावर का बोलते आहे?, कारण सोप्प आहे, अगदी रोजच म्हटलं तर वावगं ठरणार नाही, पण असे असंख्य प्रयोग करत राहावे लागतात अनेक जणांसाठी. म्हणून सहज वाटलं लिहावं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...