माझा सध्या प्रवास ऑफिस ला आणि परत असा ऑफिस
बस ने सुरु आहे. माझं सहज लक्ष गेलं म्हणून हा लेख प्रपंच. त्याच असं झालं
कि जेव्हा माझे सहकारी ऑफिस सुटायच्या वेळेला बस मधे चढतात तेव्हा बहुतेक
सगळ्यांच्याच पिशवीतून रिकाम्या डब्याचा आवाज येतोच, कारण कदाचित एका
पिशवीत एका पेक्षा अनेक डब्बे असतील, चमचा असेल... ह्याचाच अर्थ अजूनही
सगळे शिकलेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी घरचाच डब्बा पसंत करतात, आणि
स्टील च्या मजबूत डब्याला प्राधान्य देतात. काही जणांना कदाचित माहित असेल
काय आहे डब्ब्यात आज ते आधीच, काहींना ते सरप्राईस, पण तोच उत्कृष्ट डब्बा
खाऊन, काम करून घराची ओढ जशी त्या कर्मचाऱ्यांना लागते तशीच त्या
डब्ब्यांनाही, तेही त्यांच्या आंघोळीची वाट बघत असणारच, म्हणजे दुसऱ्या
दिवशी पुन्हा ते काय घेऊन ऑफिस ला जाणार ह्याची उत्सुकता निराळीच, नाही का.
डब्याची भावना पण महत्वाची असते असं मला वाटलं. संपूर्ण दिवस काम झाल्यावर
घरी परत जातांना आमच्या प्रवासाची सुरवात अशी सुरीली होते, दररोज.... सर्व
डब्यांचे मनःपूर्वक आभार.
शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा